मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेलं उपोषण सोडावं यासाठी त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सरकारकडून सुरु आहेत. मात्र सरकारच्या शिष्टाईला अद्याप यश आलेलं नाही. आज दुपारी सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. याआधी अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. दरम्यान आज शिष्टमंडळ आल्यानंतरच सरकारचं काय म्हणणं आहे ते समजेल असं जरांगे पाटील म्हणाले.

आज मनोज जरांगे पाटील यांनी काय म्हटलं आहे?

“सरकारच्या वतीने अर्जुन खोतकर यांनी माझ्याकडे निरोप घेऊन आले. काल जी बैठक झाली त्यानंतर शिष्टमंडळ आपल्या भेटीला येणार आहे. सरकारचं शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. शिष्टमंडळ आल्यानंतर बैठकीत काय निर्णय झाला ते कळणार आहे. एक महिन्याची मुदत सरकारतर्फे मागण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला कुणी आव्हान देऊ नये असं सरकारला वाटतं आहे. मी त्यांना त्यावर सांगितलं तीन महिन्यांचा वेळ समितीला देण्यात आला होता. मराठा समाजाचा मूळ व्यवसाय शेती आहे. एक जीआर काढण्याचा प्रश्न आहे. पूर्वीपासून आमचा व्यवसाय शेती आहे कुणबी जात प्रमाणपत्र चॅलेंज करता येत नाही. आम्ही पूर्वीपासून ओबीसीमध्ये आहोत. एक ओळीचा जीआर करायचा आहे की मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं. यासाठी काय आधार आहे ते मी सांगितलं. सरकारला यात काही अडचण नाही. सरकारने जी.आर. काढावा यासाठी आम्ही आशावादी आहोत. चर्चा केली पाहिजे त्यातून मार्ग निघत नाही. चर्चा केली म्हणजे आंदोलन मागे घेणार असं नाही. आंदोलन जी.आर. आल्याशिवाय मागे घेणार नाही.” असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांची अधिकृत भूमिका माहित नाही. असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

Girish Mahajan criticizes Eknath Khadse in jalgaon
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य
Uddhav Thackeray
“शिवसेनेला नकली सेना म्हणणाऱ्यांना…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर थेट प्रहार; म्हणाले “इंजिनाची चाकं…”
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Satej Patil criticize Sanjay Mandlik says MPs do not meet even for a simple letter
साध्या पत्रासाठीही खासदार भेटत नाहीत; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका

आज आरक्षण मिळेल ही अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला

१ जून २००४ ला मराठा-कुणबी एकच आहे हा जीआर काढला होता. मराठा समाजाला आरक्षण देताना मूळ व्यवसाय शेती हा निकष लावला होता. आता अडचण येणार नाही. जीआर काढाल ही अपेक्षा, आम्ही आशावादी आहोत. चर्चा केली पाहिजे, चर्चेशिवाय मार्ग निघत नाही” अस मनोज जरांगे पाटील म्हणाले. सरकारी शिष्टमंडळ भेटीला येणार आहे, त्यावर ते म्हणाले की, “आज प्रश्न सुटला पाहिजे. ते काहीही करु शकतात. मोठे निर्णय घेतात. हा छोटा विषय आहे. आज आरक्षण मिळेल अशी संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षा आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. आता आज सरकारचं शिष्टमंडळ भेटल्यानंतर नेमकं काय काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.