सांगली : पोलीस असल्याची बतावणी करत फसवणूक करण्याच्या दोन जेष्ठ नागरिकांच्या हातून सुमारे सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने लंपास करण्याच्या दोन स्वतंत्र घटना घडल्या असल्याची माहिती शनिवारी पोलिसांच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका घटनेत मिरज शहरातील समर्थ हॉस्पिटल परिसरात निवृत्त शिक्षक शिवहरी महामुनी (वय ८६) हे चालत जात असताना एका अनोळखी व्यक्तीने पोलीस असल्याचे सांगत हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या व गळ्यातील सोन्याची साखळी काढून घेतली. या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा – सांगली : मिरज, विट्यातील आगीत लाखोंचे नुकसान

हेही वाचा – “संतोष बांगर महात्मा आहेत?” ‘तो’ व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सवाल; म्हणाले, “लहानग्यांचा राजकारणासाठी वापर…”

याचबरोबर तासगाव तालुक्यातील शिरगाव येथे रमाकांमत लोकरे (वय ७२) ही वृध्द व्यक्ती लुनावरून (एमएच 10 इएफ 2515) वरून निघाला असता तोतया पोलीसांने अडविले. या मार्गावरून चोरटी गांजा वाहतूक होत असल्याचे सांगत झडती घेण्याचा बहाणा करत अंगठी व सोनसाखळी काढून रूमालात बांधण्याचा बनाव करत लंपास केले. या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jewelery worth half a lakh looted by fake police in sangli district ssb
First published on: 10-02-2024 at 17:50 IST