कळवा-खाडी पुलाच्या उद्घाटनच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विनयभंग झाल्याची तक्रार एका महिलेने दाखल केली होती. मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्याविरोधात ३५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या आरोपानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. ते ठाण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “३०७, ३२३, ३२३ हे सगळे गुन्हे मला मान्य हे माझ्याहातून घडले आहेत आणि घडू शकतात. पण, ३५४ सारखा विनयभंगाचा गुन्हा अमान्य असून, जो मी आयुष्यात कधी केला नाही. पोलिसांनी हा गुन्हा कसा काय नोंद केला. त्या महिलेने एफआयआरमध्ये वापरलेले शब्द व्हिडीओत स्पष्ट ऐकू येत आहेत. समाजात माझी मान खाली जाईन, अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करायचा हा षडयंत्राचाच भाग असू शकतो,” असा आरोपी आव्हाड यांनी केला.

youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”
lakshmi narayan yoga 2024
एप्रिल महिना सुरु होताच या ३ राशींना मिळेल अपार पैसा; बुध-शुक्राच्या युतीमुळे निर्माण होईल लक्ष्मी नारायण योग!
Gajkesari Rajyog In Three Rashi On 27th March 2024 Horoscope
२७ मार्चपासून अडीच दिवस ‘या’ ३ राशींची प्रगती कुणी अडवू शकत नाही; दुप्पट शक्तीचा गजकेसरी योग देईल लक्ष्मीकृपा

हेही वाचा : विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेला आव्हाडांनी ‘बहीण’ म्हटलं? राष्ट्रवादीने जुना VIDEO केला सादर

“हर हर महादेव चित्रपटाप्रकरणी झालेल्या गुन्हाचं मला काही बोलायचं नाही. माझ्या मुलीला तिच्या मैत्रिणीने विचारलं, ‘तुझ्या वडिलांनी विनयभंग केला का?’ इतक्या खालचं राजकारण सुरु असून यात न राहिलेलं बरं. माझ्या खुनाचा कट रचला असता, काही वाटलं नसते. पण, ३५४ कलम मनाला लागला. ३५४ आणि ३७६ साठी मी जन्माला आलो नाही. राजकारणात आक्रमकपणा नवीन नाही. खालच्या पातळीवरील राजकारण महाराष्ट्रात होऊ नये. घरे उद्ध्वस्त होतील,” असे आवाहनही आव्हाड यांनी केलं.