सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत असलेल्या मुद्दा म्हणजे मशिदींवरील भोंगे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये या मुद्द्याला हात घातल्यानंतर १२ एप्रिलच्या सभेमध्ये पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकारला मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी तीन मेचं अल्टीमेटम दिलं आहे. असं न झाल्यास आपण मशिदींसमोर भोंग्यांवरुन हनुमान चालीसा वाजवू असं राज यांनी म्हटलंय. मात्र यामुळे राज्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच माजी आमदार लक्ष्मण माने यांनी राज ठाकरेंवर टीका करतानाच थेट त्यांचे चुलत बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच राज यांना आवर घालण्याची विनंती केलीय.

नक्की वाचा >> “येईल, भाषण देईल आणि…”, औरंगाबादेत NCP कार्यकर्त्यांसमोर सुप्रिया सुळेंनी उडवली राज यांची खिल्ली; सभागृहात पिकला हशा

साताऱ्यामध्ये सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये लक्ष्मण माने यांनी, “राज ठाकरेंचं वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणार असून त्यांच्याविरोधात पोलिसांनी तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी केलीय. इतकच नाही तर पुढे बोलताना माने यांनी, “मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाची समजूत काढावी, नाहीतर घटनात्मक विधीमंडळ प्रमुख म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा,” असं आवाहन केलं आहे. तसेच, “मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर (राज ठाकरेंवर) गुन्हा दाखल केला नाही तर प्रसंगी मी स्वत: त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहे,” असं इशाराही लक्ष्मण मानेंनी दिलाय.

Rajasthan Loksabha Election 2024 Left candidate BJP takes donations from beef selling company
गोमांस विकणाऱ्या कंपन्यांकडूनच भाजपाला देणग्या; राजस्थानमधील एकमेव डाव्या उमेदवाराचा आरोप
MLA Jitendra Awhad alleges that administration is being used for political gain in the state
राज्यात प्रशासनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही
Manmohan Singh journey from economic reform face to accidental PM analysis by Neerja Chowdhury
आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?

नक्की वाचा >> “मशिदीवरील भोंगे काढण्याचा निर्णय देशातील कोणत्याही न्यायालयाने कधीही दिलेला नाही; त्यांनी असा एक तरी…”; राज यांना खुलं आव्हान

“राज्य सरकारला भोंग्यांबद्दल अल्टीमेटम देणाऱ्या राज ठाकरेंची औकात काय आहे?”, अशा शब्दांमध्ये लक्ष्मण मानेंनी राज यांच्यावर निशाणा साधलाय. “ज्यांना हिंदू राष्ट्र हवं आहे त्यांना माझं खुलं आव्हान आहे की त्यांनी सर्वसामान्यांना फसवण्याचा धंदा बंद करावा. कारण हिंदू राष्ट्रासाठी गळा काढणारे मूठभर लोक आहेत. अस्पृश्य, भटके, अल्पसंख्यांक, ख्रिश्चन, यहुदी, लिंगायत, जैन या जातीच्या लोकांना हिंदू राष्ट्र हवे आहे का?” असा प्रश्न माने यांनी उपस्थित केला.

नक्की वाचा >> काँग्रेस, राष्ट्रवादीला शिवसेनेकडून मोठा धक्का; ‘त्या’ पत्रावर स्वाक्षरी करण्यास दिला नकार

“डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातींचा अभ्यास करुन समन्वय साधणारे भारतीय संविधान तयार केलं. त्यावर आक्रम करुन भाजपाने देशात आणि राज्यामध्ये धुडगूस घातलाय,” असा टोला माने यांनी लगावला. राज ठाकरेंनी केलेली मागणी आणि भाजपाकडून होत असणाऱ्या संविधानावरील आक्रमणाचा निषेध करत असल्याचं सांगत, “राज ठाकरेंनी केवळ ठाकरे घरण्यात जन्म घेतलाय. त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे परिवर्तन चळवळीमधील एक मोठे नेते होते. त्यांच्या विचारांचा आदर्श वर वारसा राज ठाकरेनी घ्यावा,” असंही माने म्हणालेत.

नक्की वाचा >> “१२ वाजता उठणाऱ्याने अजित पवारांवर टीका केली म्हणून…”; राष्ट्रवादीचा राज ठाकरेंना टोला

“मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास आम्ही तलवारी काढू, हे राज ठाकरेंचे वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे. भारतीय दंड विधानाप्रमाणे असं वक्तव्य करणं हा फौजदारी गुन्हा आहे. म्हणूनच पोलिसांनी तात्काळ त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी माने यांनी केलीय. पुढे बोलताना माने यांनी, “मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवाहन करतो की त्यांनी आपल्या भावाची (राज ठाकरेंची) समजून काढावी. नाहीतर घटनात्मक विधीमंडळ प्रमुख या नात्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा. याबद्दल मी स्वत: पत्र लिहून तशी विनंती करणार आहे. राज कोणाची तरी सुपारी घेऊन काम करतायत,” असंही म्हटलं.

नक्की वाचा >> राष्ट्रवादी विरुद्ध मनसे वाद चिघळला : शरद पवारांचा चेहरा म्हशीच्या…; मनसेनं आव्हाडांना दिलं उत्तर

“धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांचा प्रतिकार केला पाहिजे. देशात आणि राज्यामध्ये कायद्याच राज्य आहे. मात्र पंतप्रधान या राजकीय संवेदनशील परिस्थितीवर अवाक्षर काढत नाहीत. त्यांना जरा देखील लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. संघाला देशात फाळणीसारखी परिस्थिती निर्माण करायची आहे का?” असा प्रश्नही माने यांनी उपस्थित केला.

नक्की वाचा >> “आजोबा होऊनही पोरकटपणा करणाऱ्या राज ठाकरेंनी…”; पवार नास्तिक असल्याच्या वक्तव्याला फोटो शेअर करत राष्ट्रवादीचं उत्तर

माने यांनी पुढे बोलताना ‘आम्ही भारतीय लोक’ नावाचं अभियान महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने राबवणार असल्याचं स्पष्ट केलंय. या अभियानाला २९ एप्रिलपासून सकाळी ११ वाजल्यापासून साताऱ्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयावरुन एक दिवसीय उपोषण केलं जाणार आहे, असं सांगितलं. “माझ्यावर हल्ला झाला तरी चालेल पण कोणीतरी या बेबंदशाहीला विरोध करायला हवा म्हणून मी या संघर्षात उतरत आहे, असंही माने म्हणाले.