“सरकारमध्ये कुठलाही समन्वय दिसत नाही. मुख्यमंत्री प्रशासनावर अवलंबून आहेत. त्यात काहीही चुकीचं नाही. पण आता प्रशासनाला नेतृत्वाला देण्याची गरज आहे. उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा पूर्ण होत नाहीत. खूप सावधपणे, संभाळून पावले उचलतात. त्यामुळे निर्णय होत नाहीत. आता ते मुख्यमंत्री होऊन आठ-नऊ महिने झाले आहेत. त्यामुळे असे संभाळून निर्णय घेणे, आता चालणार नाही” अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात बोलत होते.

आणखी वाचा- ठाकरे सरकारमध्ये काही स्वयंघोषित मुख्यमंत्रीही; फडणवीसांनी डागली तोफ

“करोनासारख्या संकटाच्या परिस्थिती निर्णय दाखवावे लागतात. मंत्र्यांमध्ये समन्वय दिसत नाही. करोना सकंट हे निर्णय क्षमता दाखवण्याचा काळ आहे” असे फडणवीस म्हणाले. “विरोधाला विरोध मी आजपर्यंत कधीही केलेला नाही. शक्य तितकं सहकार्य मी करतोय. ठाकरे सरकारकडून अद्यापपर्यंत एकाही पत्राला उत्तर मिळालेलं नाही” असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा- उद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले – राज ठाकरे

“पत्रांना उत्तर मिळालं नाही. पण मी पाठवलेल्या पत्रांनंतर सरकारकडून काही निर्णय झाल्याचेही दिसले” असे त्यांनी सांगितले. नायर रुग्णालयात करोनामुळे झालेल्या मृत्यूंचे प्रकरण दडवण्याचा प्रकार समोर आणल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन आपल्याशी चर्चा केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.