महाराष्ट्रात १४२७ करोना रुग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट ९४ टक्के

मागील २४ तासात ७१ मृत्यूंची नोंद

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात १४२७ करोना रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १८ लाख ६ हजार २९८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९४.४ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ३ हजार ४३१ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये ७१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज घडीला राज्यातला मृत्यू दर २.५७ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २४ लाख १ हजार ६३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख १३ हजार ३८२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ७७ हजार ५८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार ६९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला ५६ हजार ८२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आज नोंद झालेल्या ७१ मृत्यूंपैकी ३९ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर पाच मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत. अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra reports 3431 new covid19 cases 1427 discharges and 71 deaths today as per state health department scj

ताज्या बातम्या