पैसे न दिल्याच्या कारणावरून मित्राचा खून

मद्यप्राशनास पैसे न दिल्याच्या रागातून डोक्यात दगड घालून दोघांनी मित्राचा खून केला.

murder
प्रतिनिधिक छायाचित्र

कोल्हापूर : मद्यप्राशनास पैसे न दिल्याच्या रागातून डोक्यात दगड घालून दोघांनी मित्राचा खून केला. विजय जर्नादन सरदेसाई असे त्याचे नाव आहे. ही घटना इचलकरंजीनजीक कबनूर गावात घडली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलिसांनी रजाक शेख आणि इस्माईल शेख या दोघा संशयितांना रविवारी अटक केली आहे.

इचलकरंजी येथील स्वामी मळ्यात राहणारा विजय सरदेसाई हा यंत्रमाग कामगार आहे. शनिवारी रात्री विजय आणि त्याचा मित्र रजाक हे दोघे जवाहरनमध्ये देशी दारू दुकानात मद्यप्राशन करत होते. त्यांनी इस्माईल शेख याला बोलावून घेतले. इस्माईल आल्यावर मद्यप्राशनास पैसे देण्याच्या कारणावरून तिघांत वाद झाला. त्यानंतर इस्माईलच्या दुचाकीवरून तिघेही फरांडे मळा येथे पोहोचले.

पैसे न दिल्याच्या रागातून रजाक आणि इस्माईल या दोघांनी विजय याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. विजयने विरोध केल्याने इस्माईलने त्याचा हात धरला आणि रजाकने विजयच्या डोक्यात दगड घातला. विजय निपचित पडल्याने भयभीत झालेले दोघे मध्यरात्री घरी परतले. दोघांनीही विजयच्या खुनाची कबुली दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Man killed friend for not returning money near ichalkaranji