राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी कोल्हापुरातील नवीन राजवाडा येथे छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन संवाद साधला. मराठा आरक्षणावरुन राज्यात सध्या वातावरण तापलं असल्याने या भेटीकडे सर्वांचं लक्ष होतं. अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात जवळपास एक तास बैठक सुरु होती. बैठकीनंतर छत्रपती शाहू महाराज यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं.

आमच्यात सर्व गोष्टींमध्ये चर्चा झाली असून अजित पवार यासंबंधी सविस्तर सांगतील असं छत्रपती शाहू महाराजांनी यावेळी सांगितलं. तसंच समाजासाठी जास्तीत जास्त जे चांगलं करता येईल ते करा असं मार्गदर्शन केलं आहे अशी माहिती त्यांनी दिली.

virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
kolhapur lok sabha marathi news, sanjay mandlik kolhapur marathi news
कोल्हापूरच्या आखाड्यात दत्तक प्रकरण तापणार ?
Aurangzeb had changed the name of Pune to 'Muhiabad' after chatrapati shivaji maharaj death
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबानं पुण्याला दिलं होतं ‘हे’ नाव; जाणून घ्या इतिहास
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक

मराठा आरक्षण प्रश्न न सोडवल्यास पुणे ते विधानभवन मोर्चा- खा. संभाजीराजे

“सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असून त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तो निकाल समजून घेऊन जे शक्य आहे ते सर्व केलं पाहिजे,” असं मराठा आरक्षणावर बोलताना त्यांनी म्हटलं. पुढे ते म्हणाले की, “मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांकडे सरकारचं लक्ष असून यापुढेही राहणार आहे. आंदोलनाबाबत आमच्यात कोणती चर्चा झालेली नाही”.

“मराठा समाजाने आता स्वत: सक्षम होऊन आपल्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे,” असंही मत त्यांनी व्यक्त केलं. “सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांनी तो करणं गरजेचा आहे. त्याचं मराठीत भाषांतर करुन समजून घेतला पाहिजे. तसंच कोर्टाचा अवमान होता कामा नये,” असंही ते म्हणाले.

मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा

“केंद्र सरकारने जर येथे लक्ष दिलं आणि त्यांना रस असला तर कायद्यात बदल करुनच तुम्हाला पुढचं पाऊल टाकता येईल हे आधीच सांगितलं पाहिजे. कायद्यात काय बसतं हे सांगायला मी काही कायदेपंडित नाही,” असं यावेळी ते म्हणाले. मराठ्यांसाठी जास्तीत करण्यासाठी ठाकरे सरकार सकारात्मक आहे असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. पण जर तुम्ही चंद्र पाहिजे, सूर्य पाहिजे म्हटलं तर कसं आणून देणार अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.