scorecardresearch

‘कास पठार कुंपणमुक्त होणार असल्याने फुलांचा बहर वाढणार’; आमदार शिवेंद्रराजेंचा विश्वास

पठारावर नेहमीसारखा फुलांचा बहर यावा म्हणून कुंपण हटवणे आवश्यक होते. त्यासाठी शिवेंद्रराजेंनी कुंपण हटवण्याची मागणी केली होती.

‘कास पठार कुंपणमुक्त होणार असल्याने फुलांचा बहर वाढणार’; आमदार शिवेंद्रराजेंचा विश्वास
कास पठार कुंपणमुक्त होणार असल्याने फुलांचा बहर वाढणार असल्याचा आमदार शिवेंद्र राजेंचा विश्वास

कास पठारावरील कुंपण हटवण्याची आपण केलेली मागणी आणि त्यावर तज्ज्ञांमार्फत पडताळणी करून जिल्हा प्रशासनाने अखेर कास पठारावरील कुंपण हटवण्याचा निर्णय झाल्याबाबत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी समाधान व्यक्त करताना प्रशासनाचे आभार मानलेत. कास पठार कुंपणमुक्त होणार असल्याने फुलांचा बहर वाढणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा- एकनाथ शिंदेंची पुन्हा शिवाजी महाराजांशी तुलना; गनिमी काव्याचा उल्लेख करत संजय गायकवाडांचं मोठं विधान

आमदार भोसले यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जागतिक वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर दरवर्षी फुलांच्या हंगामात हजारो पर्यटक येत असतात. अलीकडे पठारावर वन विभागाने फुलांच्या सुरक्षिततेसाठी तारेचे कुंपण घातले होते. त्यानंतर मात्र, फुलांच्या संख्येत मोठी घट होऊ लागली. तसेच पाळीव प्राणी आणि वन्य प्राण्यांनाही कुंपणाची अडचण होऊ लागली. कुंपणाचे अनेक दुष्परिणाम होत असल्याने हे कुंपण हटवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. कुंपण हटवून पूर्वीसारखे पठार मोकळे करा, अशी मागणी आपण केली होती. जनावरांच्या मुक्त वावरामुळे विविध प्रकारच्या वनस्पतींच्या बिया सर्वत्र पसरल्या जायच्या आणि त्यातूनच पठारावर विविध वनस्पती आणि असंख्य रंगाची आणि प्रकारची फुले बहरायची. मात्र तारेच्या कुंपणामुळे पठारावरील फुलांच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचे शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा- “दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते आणि…”, पुरंदरेंचा उल्लेख करत काँग्रेसचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

पठारावर नेहमीसारखा फुलांचा बहर यावा म्हणून कुंपण हटवणे आवश्यक होते. त्यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करून सर्व बाबींची तंज्ञांमार्फत पडताळणी करावी आणि कुंपण हटवावे, अशी मागणी केली होती. तज्ज्ञांच्या पडताळणीतही कुंपणामुळे फुलांची संख्या घटल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पठारावरील कुंपण हटविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुढील वर्षी हंगामात कास पठारावर नेहमीप्रमाणे रंगीबेरंगी फुलांचा बहर दिसेल आणि पर्यटनही वाढेल असे शिवेंद्रराजेंनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 18:47 IST

संबंधित बातम्या