scorecardresearch

Premium

“सहानुभूतीच्या नावावर मते मागितली, नंतर फटाके फोडले” मुरजी पटेलांची ऋतुजा लटकेंवर टीका

“अंधेरीला पहिला महिला आमदार भेटल्या आहेत, त्यांना…”, असेही मुरजी पटेल म्हणाले

Murji Patel Rutuja Latake
मुरजी पटेल ऋतुजा लटके ( संग्रहित छायाचित्र )

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) ऋतुजा लटेकांचा विजय झाला आहे. लटकेंना ६६ हजार २४७ मतं मिळाली आहे. तर, नोटाला १२ हजार ७७८ मतं मिळाली असून, १ हजार ५६९ मतांसह राजेश त्रिपाठी तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाकरे गटाचा पहिलाच दणदणीत विजय आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. मात्र, यावर भाजपाचे नेते मुरजी पटेल यांनी टीका केली आहे.

“निवडणुकीतून माघार घेतली नसती, तर एक लाख २० हजार मते भाजपाला मिळाली असती. मात्र, याच्यात आम्हाला पडायचं नाही, ऋतुजा लटकेंना मी शुभेच्छा दिल्या आहेत. पण, एका गोष्टीची खंत वाटत आहे. श्रद्धांजली आणि सहानुभूतीच्या नावावर मते मागितली आणि नंतर फटाके फोडले आणि ढोल वाजवले, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,” अशी टीका मुरजी पटेल यांनी ऋतुजा लटकेंवर केली आहे.

Dhananjay-Munde-13
पीक विमा भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न – धनंजय मुंडे
uddhav-thackeray-and-eknath-shinde
“पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये मदत करायचो”, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया, म्हणाले, “नशीब…”
marathi women denied flat in mulund west viral video
“महाराष्ट्रीयन अलाऊड नाही” म्हणणाऱ्या बाप-लेकानं मराठी महिलेची मागितली माफी; नेमकं घडलं काय होतं? पाहा Video!
What chhagan bhujbal Said?
“पुण्यात हजारो महिला अथर्वशीर्ष म्हणताना दिसल्या पण भिडेवाड्यात कुणीही…”, छगन भुजबळ यांची खंत

हेही वाचा : ‘हर हर महादेव’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटावर संभाजीराजे संतापले, इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप

“अंधेरीला पहिला महिला आमदार भेटल्या आहेत. त्यांना प्रत्येक कामात सहकार्य करु. मात्र, बांद्रा येथील तृप्ती सावंत यांच्याबद्दल जे घडलं, तसे २०२४ ला ऋतुजा लटके यांच्याबद्दल होऊ नये हीच अपेक्षा आहे. तसेच, एकाही भाजपा कार्यकर्त्याने नोटाला मतदान करण्यास सांगितलं नाही. स्वत:चा कमीपण समोर येऊ नये म्हणून असा आरोप येत आहे. १ लाख ९० हजार लोकांनी मतदान केलं नाही, याचं उत्तर महाविकास आघाडीला द्यावे लागले,” असेही मुरजी पटेल यांनी म्हटलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Murji patel on rutuja latake over andheri by poll election ssa

First published on: 06-11-2022 at 20:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×