वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना पवार हे भाजपाचेच असल्याचे म्हटले होते. त्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर देताना म्हटले, “पवार साहेब काय आहेत? हे अवघ्या देशाने पाहिलेले आहे. ज्यावेळी प्रकाश आंबडेकर यांनी भाजपाची बी टीम असलेल्या एमआयएमसोबत हातमिळवणी केली होती. त्यांच्यासोबतही आंबेडकरांचे पटले नाही. त्यांचे कुणासोबतच पटू शकत नाही. त्यामुळे प्रकाश आंबडेकर यांनी लवकरच शुद्धीवर यावे.”
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
“शरद पवार भाजपाचे असते तर महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करुन त्यांनी भाजपाला रोखले नसते. ‘५० खोके, एकदम ओके’ करुन आणि सूरत तसेच गुवाहटीच्या कामाख्या देवीला आमदारांना नेऊन मविआ सरकार पाडण्याचा प्रकार करण्यात आला. त्यामुळे प्रकाश आंबेडकर बोलतात म्हणून पवार साहेब भाजपाचे होते नाहीत. आंबेडकरांच्या शब्दावर देश चालत नाही. पवार साहेबांची उंची काय आहे, हे सर्वांना माहीत आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी पवारांनी सत्तेचा विचार केला नाही. सत्तेसाठी काम करणारे पवार साहेब नाहीत. प्रकाश आंबडेकर यांनी शुद्धीवर येऊन बोलले तर बरे होईल.”, अशी खरमरीत टीका विद्या चव्हाण यांनी केली.
“शरद पवारांबद्दल आदर ठेवून बोललं पाहिजे” संजय राऊतांच्या विधानावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी…”
काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, “शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितलं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. २०१९ च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं”