भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांच्याबरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच घेतला होता, असं विधान फडणवीसांनी केलं. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

फडणवीसांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांना सध्या शरद पवारांचा सहारा आहे, अशा आशयाचं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं. त्या परभणी येथे ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.

shrinivas pawar and ajit pawar
Shrinivas Pawar : अजित पवारांचा शरद पवारांवर घर फोडल्याचा आरोप? थोरले भाऊ म्हणाले, “त्यांच्या डोक्यात…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Harshvardhan Patil On Ajit Pawar
Harshvardhan Patil : “मी पहाटे उठून कुठे जात नाही”, हर्षवर्धन पाटील यांची अजित पवारांवर खोचक टीका
Sanjay Raut Said This Thing About Devendra Fadnavis
Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुश्मनी नाही, ते आमचे…” ; संजय राऊत यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य
Nationalist Ajit Pawar Group MLA Yashwant Mane
यशवंत माने यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा कोण? मोहोळमध्ये आघाडीत इच्छुकांची भाऊगर्दी
18 against former corporator MLA Anna Bansode Pimpri Assembly Constituency
पिंपरी विधानसभा: १८ माजी नगरसेवक विरोधात गेल्यास अण्णा बनसोडे म्हणाले, अजित पवार जो निर्णय…
prakash ambedkar allegation on sharad pawar
“मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती”; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; म्हणाले, “दुबई विमानतळावर…”
sambhajiraje chhatrapati on kolhapur mp seat
“लोकसभेला कोल्हापूरची जागा स्वराज्य पक्षाला देण्याचा शब्द काँग्रेसने दिला होता, पण…”; नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

हेही वाचा- सत्यजीत तांबे लवकरच भाजपात पक्षप्रवेश करणार? ‘त्या’ ट्वीटनंतर चर्चांना उधाण; म्हणाले, “उडत्या पाखरांना…”

देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तुम्ही जो प्रश्न विचारत आहात, तो मुळात देशातील चर्चेचा मुद्दाच नाही. तो फक्त देवेंद्र फडणवीसांना राजकारणासाठी कदाचित सोयीचा असेल. प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या बातम्या लागत नसतील, म्हणून ते सध्या शरद पवारांचा सहारा घेत असतील, अशीही शक्यता आहे.”

हेही वाचा- “शरद पवार असं धोकेबाज…”, फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर संजय राऊतांचं थेट विधान!

“कारण बिचाऱ्या देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या पक्षामध्ये बाकीचे लोक हलायला जागा देत नसतील. त्यामुळे ते पवारांचं नाव घेऊन दररोज काहीतरी नवीन वावड्या उठवत आहेत, अशी शक्यता आहे. कारण या राज्याची सहा-सहा खाती त्यांच्याकडे आहेत. गृहमंत्री आणि उर्जामंत्री म्हणून ते अपयशी ठरले आहेत. ज्या व्यक्तीकडे अर्थमंत्रीपद आहे आणि त्याच्यावर अर्थसंकल्पाची जबाबदारी आहे. अशा व्यक्तीला अशी कंड्या पिकवायला (गॉसिप) वेळ कसा मिळतो? त्यामुळे मला आपल्या राज्याची चिंता वाटायला लागली आहे,” असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.