Sharad Pawar Video : कुणाला सांगताय म्हातारा झालो, तुम्हाला काय ठाऊक आहे? तुमची साथ आहे तोपर्यंत हे गाडं थकणार नाही, थांबणार नाही. शरद पवारांनी २०२२ मध्ये एक भाषण केलं होतं. त्यातला व्हिडीओ पोस्ट करुन राष्ट्रवादी काँग्रेसने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आज निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचा आहे असा निर्णय दिला. तसंच घड्याळ हे चिन्हही अजित पवारांनाच दिलं आहे. त्यानंतर शरद पवार गटाकडून भावनिक साद घालण्यात आली आहे.

शरद पवारांचा व्हिडीओ २०२२ चा

शरद पवार यांचा जो व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे तो २०२२ मधला आहे. वय झालं अशी टीका त्यावेळीही त्यांच्यावर झाली होती. ज्यानंतर उत्तर म्हणून हे भाषण शरद पवार यांनी दिलं होतं. त्यात मी थकणार नाही म्हटलं होतं. अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनीही शरद पवार यांचं वय झाल्याचा मुद्दा मांडला होता. त्यानंतर शरद पवार यांनीही अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. आता निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ पोस्ट करत राष्ट्रवादीने भावनिक आवाहन केलं आहे.

jitendra awhad, Badlapur school case,
तुम्हाला आता समजले असेल महाराष्ट्र पोलिसांनी विश्वासार्हता का गमावली, जितेंद्र आव्हाडांची टीका
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Jitendra Awhad, Badlapur Sexual Assault,
आता महाराष्ट्र बंद करण्याची वेळ आली आहे – जितेंद्र आव्हाड
Rajendra Shingne on Ajit Pawar
Rajendra Shingne : आमदार राजेंद्र शिंगणेंचं मोठं विधान; म्हणाले, “अजित पवारांबरोबर नाईलाजाने…”
supriya Sule hopes that Maharashtra also gets justice
महाराष्ट्रालाही न्याय मिळावा;  सुप्रिया सुळे यांची अपेक्षा
What Imtiyaz Jaleel Said?
Imtiyaz Jaleel : “उद्धव ठाकरे नवे सेक्युलरवादी, त्यांना मुस्लिम मतं चालतात पण मग..”, इम्तियाज जलील यांचा सवाल
The MP of the Nationalist Sharad Pawar group Dr Amol Kolhe was also asked to answer by the Maratha protesters
डॉ. अमोल कोल्हे यांनाही मराठा आंदोलकांकडून विचारणा
suresh Mhatre Bhiwandi mp marathi news
“मी कधी-कधी विसरतो मी राष्ट्रवादीत आहे, मी शिवसेनेत असल्यासारखाचं वागतो”, शरद पवारांच्या खासदाराचे वक्तव्य

शरद पवार काय म्हणत आहेत व्हिडीओत?

या व्हिडीओत शरद पवार म्हणाले होते, “मी आता ८०-८२ वर्षाचा झालोय असं सांगता, कुणाला सांगताय म्हातारा झालोय. तुम्हाला काय ठाऊक आहे अजून. तुम्ही काय त्याच्या खोलात जाऊन पाहिलंय. जोपर्यंत तुम्हा लोकांची साथ आहे, तोपर्यंत हे गाडं थकणार नाही, थांबणार नाही.” त्यानंतर राष्ट्रवादीने म्हटलंय की ‘२०२२च्या व्हिडिओत साहेबांचं जे म्हणणं आहे ते आजही तंतोतंत तसंच आहे. कारण, त्यानंतर अनेक राजकीय वादळं आली तरीही हा मनुष्य खचत नाही, साहेबांची इच्छाशक्ती अजूनही प्रचंड आहे. कोणत्याही संकटाला ते आजही निधड्या छातीने सामोरं जातात, म्हणूनच ते आमचे साहेब आहेत!!’

हे पण वाचा- “आज अजित पवारांनी शरद पवारांची राजकीय गळचेपी केली आणि..”, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

अजित पवारांकडे किती संख्याबळ?

महाराष्ट्र- ४१ आमदार
नागालँड-७ आमदार
झारखंड-१ आमदार
महाराष्ट्र विधान परिषद- ५ आमदार
राज्यसभा १ खासदार

शरद पवारांसह किती आमदार?

महाराष्ट्र -१५ आमदार
केरळ -१ आमदार
महाराष्ट्र विधान परिषद -४ आमदार
लोकसभा खासदार-४
राज्यसभा ३

अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. अखेर अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह आणि पक्षनाव देण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पक्षचिन्ह आणि पक्षनावासाठी तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.