सांगली : सांगली बाजार समितीमध्ये नवीण बेदाण्याला मुहुर्ताच्या सौद्यामध्ये हिरव्या बेदाण्याला  १६१ तर पिवळ्या बेदाण्याला १५१ रूपये प्रतिकिलो दर मिळाला. सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते यंदाच्या हंगामातील बेदाणा सौद्यांना प्रारंभ करण्यात आला. पहिल्या सौद्यासाठी पन्नास टन बेदाण्याची आवक झाली. बाजार समितीचे संचालक संग्रामदादा पाटील, आनंदराव भाऊ नलवडे, पप्पू मजलेकर, काडाप्पा वारद, मारुती बंडगर ,सचिव महेश चव्हाण यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून बेदाणा सौदा शुभारंभ करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “मी मनोज जरांगेंना विनंती केली आहे की…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “सरकार जर…!”

त्यावेळी नवीन मालास कन्हैया ट्रेडर्स दुकानात  १६१ रुपये उत्तम प्रतीच्या हिरव्या मालास दर मिळाला. तर पिवळ्या बेदाण्यास हजारे सेल्स कार्पोरेशन व गुरुबसवेडर ट्रेडिंग कंपनी दुकानात  १५१ रुपये, तर काळा बेदाण्याला  ५० रु.प्रति किलो दर मिळाला.त्यावेळी मुरघेंद्र ट्रेडिंग कंपनी, शेखर पुरुषोत्तम ठक्कर ,हजारे सेल्स कार्पोरेशन, सचिन ट्रेडींग कंपनी, मयुरेडर ट्रेडींग कंपनी,जयशितला ट्रेडींग कंपनी, मेंढे अग्रोटेक, सहारा ट्रेडींग कंपनी , यादव ट्रेडर्स, एन. एम. माळी कंपनी, गणेश ट्रेडिंग कंपनी ,गुरु बसवेडर कंपनी, हडदरे ट्रेडिंग कंपनी, अस्की नेमीनाध कंपनी, आर के भंडारी कंपनी, अर्णव ट्रेडर्स या  १८  दुकानात  ५०  टन नवीन बेदाण्याची आवक झाली होती.

हेही वाचा >>> मोठी बातमी! मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला आझाद मैदानात परवानगी नाकारली

शुभारंभ प्रसंगी सभापती श्री. शिंदे म्हणाले सांगली बेदाणा  मार्केट हे शेतकर्‍यांच्या माल विक्री साठी देशात प्रसिद्ध आहे. या मार्केटमध्ये शेतकर्‍याच्या मालाला खुल्या सौद्यामध्ये योग्य भाव दिला जातो. शेतकर्‍यांना पट्टी ही लवकर दिली जाते. चालू वर्षी शेतकरी आर्थिक संकट सापडला असून त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावेळी अध्यक्ष राजेंद्र कुंभार, मनोज मालू ,सुशील हडदरे, कांतीभाई पटेल ,शेखर ठक्कर, निर्मल रुणवाल, पवन चौगुले,  गुलशन अग्रवाल, सुनील खोत, हिरण पटेल, विनायक हिंगमिरे आदी व्यापारी, बेदाणा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New raisin get 161 per kg rate in sangli bazar committee zws