नाशवंत म्हणून अल्प काळ टिकण्याची क्षमता असलेल्या फळे आणि पालेभाज्यांना आता वर्षभर सुरक्षित ठेवता येणे शक्य होणार आहे. काढणीपश्चात काही दिवसांत नाशवंत होणारी फळे-पालेभाज्या, त्यांचा रंग, सुगंध, पौष्टिक तत्त्व सुरक्षित ठेवून एक वर्षांपर्यंत साठवून ठेवणे संपूर्ण सौरऊर्जेवरील वाळवण यंत्रामुळे आता शक्य आहे. अंबाजोगाईच्या वैभव तिडके व शीतल सोमाणी यांच्या सायन्स फॉर सोसायटीच्या चमूने राज्यभरात १४ ठिकाणी ही यंत्रे बसविली आहेत. शेतकऱ्यांना हंगामातील अतिरिक्त फळे, भाज्या साठवून अधिक उत्पन्न मिळवून देण्यात हे यंत्र फायदेशीर ठरणार आहे.
संशोधन काय?
शेतिप्रधान देशात शेतीच्या प्रगत तंत्रज्ञानाअभावी दरवर्षी तब्बल ६० लाख दशलक्ष टन फळे-भाजीपाल्याची नासाडी होत असल्याचे एका पाहणीत समोर आले. त्यामुळे आपल्या संशोधनाचा शेतकऱ्यांसाठी उपयोग व्हावा, या विचाराने वैभव तिडके व त्यांच्या सहकारी मित्रांनी प्रयत्न सुरू केले. शेतकऱ्यांसाठी नगदी पसे देणारी फळे व पालेभाज्या जास्त दिवस कशी टिकवता येईल, यावर प्रयत्न झाले. त्यातून संपूर्ण सौरऊर्जेवरील वाळवण यंत्र विकसित झाले.  सध्या बाजारात विजेवर चालणारी वाळवण यंत्रे आहेत. पण ती शेतकऱ्यांना परवडत नाहीत. एक किलो भाजी वाळविण्यासाठी ५० ते १०० रुपये खर्च येतो. त्यामुळे संपूर्ण सौरऊर्जेवरील वाळवण यंत्र शेतकऱ्यांना वरदानच ठरणार आहे. केवळ साडेतीन हजार रुपये प्रतिवर्ग मीटर खर्चात सव्वाशे किलो फळांचे र्निजतुकीकरण करून वाळवण करता येते. एकदा यंत्र विकत घेतल्यानंतर कोणताही अतिरिक्त खर्च नाही. यंत्रामुळे हंगामानंतरही फळे, भाज्या त्यांचा रंग, जीवनसत्त्व सुरक्षित ठेवून एक वर्षांपर्यंत साठवून ठेवणे शक्य झाले आहे.
उपयोग काय?
सध्या औरंगाबाद, पाल्रे, सावंतवाडीसह १४ ठिकाणी हे यंत्र बसविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात भाव नसताना माल साठवून ठेवून भाव आल्यास विक्री करणे शक्य होणार आहे. त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल, असा वैभव तिडके यांना विश्वास आहे. या संशोधनाला नुकतेच आंतरराष्ट्रीय स्पध्रेत तब्बल ३५ लाख रुपयांचे घसघशीत बक्षीस मिळाले. शीतल सोमाणी हिला विशेष सादरीकरणास ५० हजारांचे बक्षीस मिळाले.
यशोगाथा
जगातील ११० देशांमधील सव्वाशे संशोधकांनी आपले संशोधन सादर केले होते. त्यातून सौर वाळवण यंत्राची निवड झाली. साहजिकच आंतरराष्ट्रीय स्तरावर हे संशोधन यशस्वी मानले गेले आहे. शेतकऱ्यांना पिकलेली फळे व भाज्या काढणीपश्चात जास्त काळ ठेवणे शक्य होत नसल्याने मिळेल त्या भावात विकणे भाग पडते. परिणामी उत्पादन खर्चापेक्षा कमी मोबदला मिळाल्याने शेतीचे अर्थकारण गडबडते. यावर सौर वाळवण यंत्र फायदेशीर ठरणार आहे. बीड जिल्हय़ातील भोगलवाडी (तालुका धारूर) येथील निवृत्त न्या. बाबुराव तिडके यांचा मुलगा वैभव अंबाजोगाई येथे योगेश्वरी महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करून मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीत दाखल झाला. शेतीशी जन्मजात जवळीक असल्याने आपल्या विज्ञानाचा शेतकऱ्यांना उपयोग झाला पाहिजे, या जाणिवेतून हे संशोधन झाल्याचे तो सांगतो. पूर्वीच्या यूडीसीटीशी संलग्न सायन्स फॉर सोसायटी ही संशोधन संस्था स्थापन करून हे यंत्र विकसित केले. या चमूमध्ये शीतल सोमाणी या अंबाजोगाईच्याच वर्ग मत्रिणीसमवेत परभणीचा स्वप्निल कोकाटे, तसेच गणेश भोर, तुषार गवारे, अश्विन पावडे, अश्विन गायकवाड, निकिता खैरनार या मुंबईच्याही तरुण संशोधकांचाोमावेश आहे.

onion, onion export ban, farmers,
कांदा निर्यातबंदी उठवूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच, झाले काय?
thane, municipal corporation, tax relief scheme, thane citizens
ठाणेकरांसाठी पालिकेची कर सवलत योजना, दहा टक्क्यापासून ते दोन टक्क्यांपर्यंत मिळणार करसवलत
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा