अकोला : बुद्धपौर्णिमेला प्राणीगणना करण्यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सहा वन्यजीव विभागांत ५ मे रोजी ‘निसर्ग अनुभव’ उपक्रम घेण्यात येणार आहे. एकूण १६५ मचाणांवरून प्राणीगणना करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाइन नोंदणी आज, २८ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे.

बुद्धपौर्णिमेला दरवर्षी अभयारण्यामध्ये प्राणीगणना करण्यात येते. यावर्षी देखील ५ मे रोजी चंद्राच्या प्रकाशात प्राणीगणना करण्यात येणार आहे. त्यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सहा वन्यजीव विभागात ‘निसर्ग अनुभव’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्राणीगणनेसाठी सहा वन्यजीव विभागांत एकूण १६५ मचाणांची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये सिपना वन्यजीव विभागात सेमाडोह २५, गुगामल वन्यजीव विभागातील चिखलदारा १५, ढाकना १०, तारुबांदा १०, अकोट वन्यजीव विभागातील सोमठाना तीन, धारगड १२, नरनाळा नऊ, मेळघाट वन्यजीव विभागातील घटांग, गाविलगड, जामली प्रत्येकी तीन, अकोट चार, धुळघाट दोन, अकोला वन्यजीव विभागातील काटेपूर्णा सात, सोहोळ दोन, बोथा १०, ज्ञानगंगा तीन, लोणार एक, पांढरकवडा वन्यजीव विभागातील टिपेश्वर १२, माथनी सहा, खरबी पाच, कोरटा आठ, बीटरगाव सात व सोनदाभी येथील पाच मचाणांचा समावेश आहे.

Mumbai, Patrachal Redevelopment Project, Siddharth Nagar, Set for Completion, by May, Patrachal case, goregaon, Patrachal news, goregaon news, mumbai news, marathi news,
पत्राचाळीतील पुनर्वसित इमारतीचे ८५ टक्के काम पूर्ण, मेअखेरीस काम पूर्ण करण्याचे म्हाडाचे नियोजन
dharavi, dharavi redevelopment project, 100 teams
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार
tadoba andhari tiger reserve marathi news, nagzira sanctuary marathi news
Video: ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील आणखी एक वाघीण नागझिरा अभयारण्यात
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी

हेही वाचा – नागपूर : लग्नाचा आग्रह धरल्याने प्रेयसीला दिले सिगारेटचे चटके

‘निसर्ग अनुभव’ उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मॅजीकल मेळघाटच्या संकेतस्थळावर २८ एप्रिलला सकाळी १० वाजतापासून ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. मचाणावर बसून प्राणीगणना करण्यासाठी नियम आखून देण्यात आले आहेत. त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याची माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक कार्यालयाचे विभागीय वनअधिकारी एम.एन. खैरनार यांनी दिली.

हेही वाचा – चंद्रपूर : हेटी येथील सरस्वती जिनींगमध्ये भीषण आग, शंभर क्विंटल कापूस जळून खाक

‘व्हीआयपीं’साठी २५ मचाण

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सहा वन्यजीव विभागांतील २५ मचाण ‘व्हीआयपीं’साठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. उर्वरित १४० मचाणांसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे.