माउलींच्या सोहळय़ाचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

मंदार लोहोकरे, लोकसत्ता

Gajanan Maharaj palanquin leaves for Ashadhi tomorrow buldhana
सातशे वारकऱ्यांसह, टाळकरी आणि पताकाधारी… गजानन महाराज पालखीचे उद्या आषाढीसाठी प्रस्थान
65 thousand trees planted in Kolhapur on the occasion of Chandrakant Patils birthday
चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात ६५ हजार वृक्ष लागवड, संगोपनाचा शुभारंभ
rain, Akola, Heavy rain,
आनंदवार्ता! अकोला जिल्ह्यात मोसमी पाऊस दाखल, विजांच्या कडकडाटासह मुसळधार, शेतकऱ्यांची लगबग
unique vision of Hindu-Muslim brotherhood Muhammad Khan Maharajas Dindi will departure to pandharpur
हिंदू-मुस्‍लीम बंधुभावाचे अनोखे दर्शन, महंमदखान महाराजांच्‍या दिंडीला पंढरपूरची ओढ
Couple Killed in accident, accident on Kolhapur ratangiri road, Tragic Dumper Accident, near Borpadale village, panhala tehsil
कोल्हापूर : डंपरच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार
only 90 warkari
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानदिनी मंदिरात एका दिंडीतील ९० वारकऱ्यांनाच प्रवेश, प्रस्थान सोहळा नियोजन बैठकीत निर्णय
Kolhapur, District Collector,
संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची शिरोळ, इचलकरंजीत पाहणी
Khamgaon, Tehsildar, notice,
“शरद पवार हाजीर हो,” खामगाव तहसीलदारांची नोटीस; मात्र…

पंढरपूर : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठाकूर बुवा समाधी येथे नेत्रदीपक गोल रिंगण पार पडले. त्यानंतर सायंकाळी माउली आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू सोपानदेव यांची बंधुभेट झाली. तर दुसरीकडे जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळय़ात तोंडले बोंडले येथे धावा झाला. संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश झाला. त्यामुळे ‘भेटी लागे जीवा लागलीस आस’ या अभंगाप्रमाणे पायी वारीतील भाविकांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे.  माउलीची पालखी वेळापूर येथून प्रस्थान ठेवून पुढे ठाकूर बुवा समाधी या ठिकाणी पोचली. या ठिकाणी माउलीचे रिंगण पाहण्यासाठी भाविक जमा होऊ लागले होते. काही वेळातच माउलीची पालखी, त्या पाठोपाठ अश्व आले.

चोपदाराने रिंगण लावले आणि अश्वाने तीन फेरी पूर्ण केली. माउली-माउली , टाळ मृदंगांचा जयघोष करीत रिंगण सोहळा पार पडला. पुढे पालखी तोंडले येथे दुपारचे भोजनासाठी विसावली. येथे दिंडय़ांना थालीपीठ, दही, विविध प्रकारच्या चटण्या, उसळा, माडग, भाकरी, भात, लोणचे, अशा प्रकारची शिदोरी तोंडले-बोंडले परिसरासह तांदुळवाडी, शेंडेचिंच, माळखांबी, दसूर, खळवे आदी भागातील गावकरी घेऊन आले होते. वारकऱ्यांनी या शिदोरीचा आस्वाद घेतला. पुढे पालखी टप्पा येथे मार्गस्थ झाली. काही वेळातच माउलींचे ज्येष्ठ बंधू सोपानदेव यांची पालखी आली. या दोन पालख्या एकमेकांना भेटल्या. या वेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठल विठ्ठलचा जयघोष केला. माउलीच्या पालखी विश्वस्तांनी सोपानदेव यांच्या मानकरी याना मानाचा नारळ दिला. बंधू भेटीचा भावपूर्ण सोहळा पाहून भाविक सुखावले. पुढे माउलीची पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी पोचली.

 जगद्गुरू तुकाराम महारज यांच्या पालखीने बोरगाव येथून प्रस्थान ठेवले. पुढे पालखी मार्गस्थ होत तोंडले बोंडले या ठिकाणी पोहोचली. या ठिकाणी पालखीतील सर्व भाविक धावले. ‘तुका म्हणे धावा .. आहे पंढरीस विसावा’ या अभंगाप्रमाणे भाविकांनी धावा केला. त्यानंतर पिराची कुरोली येथे मुक्कामी पोहोचली. सर्व संतांच्या पालख्यांनी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला आहे. पंढरपूरच्या जवळ आल्याने भाविकांना आता आस लागली ती पांडुरंगाच्या दर्शनाची.

आज पालखी कुठे ?

माउलीची पालखी शुक्रवारी भंडीशेगाव येथून मार्गस्थ होऊन बाजीराव विहीर येथे चौथे गोल रिंगण व उभे रिंगण होऊन पालखी वाखरी येथे विसावेल. तर जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी पिराची कुरोली येथून मार्गस्थ होईल. या सोहळय़ाचे बाजीराव विहीर येथे उभे रिंगण होऊन पालखी वाखरी मुक्कामी दाखल होईल. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू सोपानदेव यांच्या पालख्यांचा गुरुवारी बंधुभेट सोहळा पार पडला.