पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

विधिमंडळ कामकाजासंदर्भात निर्धारित नियमावलींचा सत्ताधारी पक्षाकडून रोज भंग केला जातो, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

विधानभवनाबाहेर पत्रकारांशी ते बोलत होते. सभागृहाच्या कामकाजावर प्रत्येक मिनिटाला ७० हजार रुपये खर्च येतो. विरोधी पक्ष व्यत्यय आणत असल्याने सभागृहाचा वेळ वाया जातो, अशी टीका केली जाते. मात्र हे खरे नाही.  सभागृह चालवण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे. अधिवेशन नागपुरात होत असल्याने येथे विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित होते, परंतु तसे होताना दिसत नाही. सरकारकडून विरोधी पक्षाला वागणूक कशी मिळते त्यावरही बरेच काही आहे, परंतु विरोधकांना अनेक विषयांवर बोलण्याची संधीही मिळत नाही.

सर्व गटनेत्यांनी काळजी घ्यावी -गिरीश बापट

विविध आयुधांचा वापर करून प्रत्येक सदस्य सभागृहात प्रश्न मांडत असतो. प्रत्येकाने वेळेची मर्यादा लक्षात घेऊन प्रश्न मांडावेत. प्रतोद आणि गटनेत्यांनीही याचा विचार करावा. सभागृहात प्रत्येक विषयावर सर्वाना बोलायला मिळणे शक्य नाही, असे मत संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी मांडले.