सोळाव्या लोकसभेत प्रथमच निवडून येणाऱ्या खासदारांमध्ये अष्टपलू कामगिरी केल्याबद्दल राजीव सातव यांना संसदरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आयआयटी, चेन्नईच्या प्राईम पॉइंट फाउंडेशनच्या वतीने रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. सी. रंगराजन यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष के. श्रीनिवास, आयआयटीचे प्रमुख भास्कर राममूर्ती, भाजपचे प्रतोद खासदार अर्जुन मेघावाल या वेळी उपस्थित होते.

Sunetra Pawar
मतदानाआधीच सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा, ‘या’ घोटाळ्यातून मिळाली क्लीन चिट!
मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित

प्राईम पॉइंट फाउंडेशनच्या वतीने लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या लोकसभा सदस्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. मागील दोन वर्षांतील कामगिरीचा आढावा घेऊन पहिल्या वेळी निवडून येणाऱ्या खासदारांना दरवर्षी त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून यंदाचा पुरस्कार राजीव सातव यांना देण्यात आला. या सोबतच लोकसभेत विविध गटांतून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, भाजपचे पी. पी.चौधरी, हिना गावीत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.