स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज पदाचा राजीनामा दिला आहे. याचबरोबर त्यांनी संघटनेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे.  राज्यात महायुतीची सत्ता आल्यावर तुपकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष पद सोपवण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी महायुतीविरोधात भूमिका घेतल्यानंतर तुपकर यांनी त्या पदाचा राजीनामा दिला होता.

रविकांत तुपकर यांनी आज (गुरूवार) संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना आपण  संघटनेचे पद व सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे कळवल्यानंतर,  शेट्टी यांनी त्यांना  तुम्ही संघटनेत अनेक वर्षे कामं केली असल्याचे सांगून पुन्हा एकदा या निर्णयाबद्दल  विचार करावा, असे सांगितले होते. मात्र, काही वेळानंतर तुपकर यांनी थेट राजीनामा पत्र लिहूनच पाठवले.

MP Prajwal Revanna Sex Scandal case
सेक्स स्कँडल प्रकरणी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर निलंबनाची कारवाई; जेडीएस पक्षाचा निर्णय
nanded lok sabha marathi news, nanded lok sabha latest marathi news
मतदारसंघाचा आढावा : नांदेड; निवडणूक चिखलीकरांची आणि नेतृत्व कसोटी अशोक चव्हाण यांची!
alliance with the BJP the opposition of the farmers Dushyant Chautala
भाजपाशी युती तुटली तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम, दुष्यंत चौटाला यांच्या अडचणी थांबता थांबेना
Congress, Nana Patole car accident,
“विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का?”, नाना पटोलेंच्या अपघातावरून काँग्रेसचा सवाल

“मी अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. माझ्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. परंतु आज मी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे” असे रविकांत तुपकर यांनी स्वाक्षरीनिशी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांना पत्र पाठवले आहे.

तुपकर हे भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे, विशेष म्हणजे त्यांनी कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांचा चिखली हा विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. तर सध्या  येथे काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे निवडून आले आहेत. तुपकर हे राजू शेट्टी यांचे खंद्दे समर्थक मानले जात होते. सदाभाऊ खोत संघटनेतून बाहेर पडल्यानंतर तुपकर हेच दोन नंबरचे नेते होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना संघटनेची साथ सोडल्याने राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसला आहे.