सावंतवाडी : कुत्र्याच्या शिकारीला बिबटय़ा घरात घुसून हल्ला करु लागला पण कुत्रा सावध झाला. बिबटय़ा व कुत्रा यांच्या या थरारक अनुभवातून घरातील माणसे सुदैवाने सावध झाली आणि बचावली आहेत. कुत्र्याच्या शिकारीला बिबटय़ा आला आणि जेरबंद झाला.  आज मध्यरात्री शुRवार— शनिवार रात्री दोनच्या सुमारास साटेली गावचे पोलीस पाटील विलास साटेलकर यांचे कडून वनविभागास मिळालेल्या खबरीनुसार साटेली येथील रहिवासी राजेंद्र उत्तम टेमकर यांचे गोडाऊन मध्ये बिबटय़ा अडकले असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच सावंतवाडी वन विभागाची बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली.  यानंतर जागेवरील परिस्थिती पाहता राजेंद्र उत्तम टेमकर यांचे घरी जिन्यावर बांधले असलेल्या कुत्र्याची शिकार करण्याच्या उद्देशाने बिबटय़ा त्यांचे घराच्या आवारात शिरला होता. त्यानंतर त्याने कुत्र्याची शिकार करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर हल्ला केला, परंतु बाहेर सुरू असलेल्या कुत्र्यांच्या गोंधळाने घरातील लोक जागे झाले व त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता बिबटय़ाने त्यांना घाबरून पळून जाण्याच्या उद्देशाने जिन्याच्या शेजारीच खाली असलेल्या गोडाऊनवर उडी मारली. परंतु गोडाऊन वर असलेल्या सिमेंटच्या पत्र्यामुळे बिबटय़ा पत्रा तोडून खाली गोडाउन मध्ये पडला.

यानंतर घर मालक राजेंद्र उत्तम टेमकर यांनी जेव्हा गोडाऊनच्या सिमेंटच्या पत्र्याच्या तुटलेल्या भागातून आत बॅटरी च्या साह्यने पाहिले असता त्यांना एक बिबटय़ा तिथे असल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ पोलीस पाटील साटेली विलास साटेलकर यांच्याशी संपर्क साधून याची कल्पना वनविभागाला दिली. यानंतर सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर व कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.   घटनास्थळी दाखल झालेल्या बचाव पथकांनी पाहणी केल्यानंतर सदर बिबटय़ा पूर्ण वाढ झालेला मोठा नर बिबटय़ा असून, त्याचे अंदाजे वय आठ ते दहा वर्ष दरम्यान असल्याचे निदर्शनास आले. बचाव पथकाने सदर बिबटय़ाला पिंजरम्य़ामध्ये घेण्यासाठी सर्व पूर्वतयारी करून घेतली. बघ्यांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी घटनास्थळी पोलीस पथकालाही पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर सर्व तयारी पूर्ण केल्यानंतर, अथक परिश्रमाने गोडाउन मध्ये अडकलेल्या बिबटय़ाला गोडाऊनचे शटर वर उचलून पिंजऱ्यात यशस्वीरित्या कैद करण्यात आले.

Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न