वाहनाच्या धडकेत बछडय़ाचा मृत्यू

वनविकास महामंडळाच्या जंगलात जुनोना-गिलबिली मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने अवघ्या सव्वा वर्षांच्या वाघिणीच्या बछडय़ाचा मृत्यू झाल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे.

वनविकास महामंडळाच्या जंगलात जुनोना-गिलबिली मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने अवघ्या सव्वा वर्षांच्या वाघिणीच्या बछडय़ाचा मृत्यू झाल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे. दोन वाघांच्या शिकार प्रकरणानंतर आता बछडय़ाचा मृत्यू झाल्याने वनखात्यावर टीका होत आहे.
चंद्रपूरजवळच्या जुनोनाच्या जंगलात काही स्त्री-पुरुष मोहफूल वेचण्यासाठी गेले असता जुनोना-गिलबिली मार्गावर रस्त्याजवळच वाघाचा बछडा मृतावस्थेत पडून असल्याचे दिसले. गावकऱ्यांनी याची माहिती लगेच वनखात्याला दिल्यावर वनविकास पथक  घटनास्थळी आले. सर्वासमक्ष पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन केले असता अवघ्या सव्वा वष्रे वयाच्या मादी बछडय़ाचा मृत्यू वाहनाच्या धडकेने झाल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदनानंतर त्याच्यावर अन्त्यसंस्कार झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Run over by vehicle leopard dies

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या