वाई: कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात तेटली (ता जावली) गावच्या हद्दीत टी अँड टी कंपनीची स्पीड बोलत वादळी वाऱ्याने उलटून
एक जण बुडाला. दोन जण पोहून बाहेर निघाले. बुडालेल्या व्यक्तीची शोध मोहीम सुरू आहे.

तेटली (ता जावली) गावच्या स्मशानभूमी समोरील जलाशयाच्या पात्रात गुरुवारी सायंकाळी उशिरा स्पीड बोटिसह एक जण बुडाला. यावेळी शिवसागर जलाशय परिसरात जोरदार वादळी वारे सुटले होते. या वादळी वाऱ्यात बोट पलटी झाली आणि बुडाली. या बोटीतून तीन जण प्रवास करत होते. यामध्ये राजेंद्र बबन राजपुरे (वय४७, रा दरेवाडी ता वाई) असे बुडालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दोघे पोहून बाहेर निघाले.

हेही वाचा – सुनील तटकरे यांच्याकडे १४ कोटी ५७ लाख रुपयांची मालमत्ता

हेही वाचा – उदयनराजे यांच्या संपत्तीत चक्क २१ कोटी रुपयांची घट

स्पीड बोट तापोळा येथे पुलाचे काम सुरू असणाऱ्या ठिकाणाहून बामनोलीकडे येत होती. तापोळा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्गम भागात अहिर ते तापोळा या पुलाचे काम टी अँड टी या ठेकेदार कंपनीला दिले आहे. सद्या हे काम सुरू आहे. सायंकाळच्या सुमारास कोयना धरण शिवसागर जलाशयाच्या नदीपात्रात जोरदार वादळी वारे सुटले होते. बोट यावेळी तापोळाकडून बामणोली कडे येत होती. पुलांच्या कामावरील कर्मचाऱ्यांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. घटनेची नोंद मेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.