Viral Video: समाजमाध्यमांवर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सातत्याने व्हायरल होताना आपण पाहतो. त्यात बऱ्याचदा प्राण्यांचे गमतीशीर, तर कधी थरकाप उडविणारे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. हे व्हिडीओ काही क्षणांत लाखो व्ह्युज मिळवतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक जंगलातील व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक बिबट्या झेब्य्राच्या पिल्लाची शिकार करताना दिसत आहे. हा थरकाप उडविणारा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. माणसांप्रमाणेच प्राण्यांनादेखील आपली भूक भागविण्यासाठी प्रयत्न करताना आपण पाहतो. अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक शमविण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर आपण पाहतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक बिबट्या झेब्य्राच्या पिल्लाची शिकार करताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका तळ्याच्या बाजूला झेब्रा त्याच्या पिल्लासोबत वेगाने धावताना दिसत आहे. यावेळी अचानक एक बिबट्या येतो आणि झेब्य्राच्या पिल्लावर हल्ला करतो आणि त्याला घेऊन जातो. पिल्लावर हल्ला झालेला पाहिल्यावर झेब्रा त्याची सुटका करण्यासाठी बिबट्याच्या मागे धावतो; पण बिबट्या पिल्लाला सोडत नाही. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @top_tier_wilderness या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओखालील कॅप्शनमध्ये 'जंगलात राहणे कठीण असू शकते! झेब्रा तिच्यासमोरच तिचे बाळ हरवते!!', असे लिहिले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ६६ हजारांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. हेही वाचा: चार्जरची वायर तोडली म्हणून मालकिणीने श्वानाच्या पिल्लाला धमकावले; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “तुम्ही खूप निर्दयी…” पाहा व्हिडीओ: एका युजरने लिहिलेय, "बिबट्या खूप चतुर प्राणी आहे." तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, "बिबट्या नेहमीच अशा हल्ल्यांमध्ये यशस्वी होतो." तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, "दु:खद; पण तो जलद मृत्यू होता. शेवटी हा निसर्गाचा नियम आहे." दरम्यान, यापूर्वीदेखील बिबट्या वेगवेगळ्या प्राण्यांची कशी कशी शिकार करतो त्याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात बिबट्या मोठ्या चतुराईने प्राण्यावर हल्ला चढवीत कशा प्रकारे शिकार करतो ते आपल्याला दिसून येते.