दहावी परीक्षेत कोल्हापूर विभागाने सलग तिस-या वर्षी राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. कोल्हापूर विभागाचा निकाल ९५.१२ टक्के इतका लागला. गतवर्षी पेक्षा विभागाच्या यंदाच्या निकालात १.२९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षीही दहावी परीक्षेत मुलींनी बाजी मारली.
राज्य माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्ह्याने ९५. ५६ टक्क्यांसह प्रथम, तर सातारा जिल्ह्याने ९५.१९ टक्यांसह दुसरा, तर सांगली विभाग ९४.४३ टक्क्यांसह तिस-या क्रमांकावर असल्याची माहिती विभागीय सचिव शरद गोसावी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला सहसचिव पी. डी. भंडारे, शिक्षण उपसंचालक एन. के. गेंधळी आदि उपस्थित होते. ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’नुसार ६ पकी ज्या ५ विषयात सर्वाधिक गुण विद्यार्थ्यांस मिळाले आहेत यानुसार निकाल जाहीर करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील ८५६ शाळांमधून ५७ हजार ८४४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, यापकी ५५ हजार २७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.०७ टक्के इतकी राहिली. २५ हजार ४९५ मुलींपकी २४ हजार ५१९ मुली उत्तीर्ण झाल्या. त्यांची टक्केवारी ९६.१७ टक्के इतकी राहिली.    
सातारा जिल्ह्यातील ६८८ शाळांमधून ४३ हजार ७११ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापकी ४१ हजार ६०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये २२ हजार ५२४ मुले उत्तीर्ण झाली. मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ९४.५४ टक्के इतकी राहिली. १९ हजार ८८७ मुलींपकी १९ हजार ०८४ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.९६ टक्के इतकी राहिली.
सांगली विभागातील ६१० शाळांमधून ४२ हजार १३२ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापकी ३९ हजार ७८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २३ हजार ४१९ मुलांपकी २१ हजार ९०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.५४ टक्के इतके राहिले. तर, १८ हजार ७१३ मुलींपकी १७ हजार ८८० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.५५ टक्के राहिले.
यंदाही मुलींची बाजी
कोल्हापूर विभागात ७९ हजार ६९२ मुलांपकी ७५ हजार १८६ इतकी मुले उत्तीर्ण झाली. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४.४६ टक्के इतके राहिले. तर ६४ हजार २१० मुलींपकी ६१ हजार ४८३ मुली उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.९२ टक्के इतके राहिले. मुलांपेक्षा १.४६ टक्के इतका अधिक निकाल मुलींचा लागला.