महाराष्ट्राच्या परकीय गुंतवणुकीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेतली आहे. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा ‘नंबर वन’ बनला आहे, असे त्यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी नेहमीप्रमाणे आकड्यांच्या सोंगट्या जनतेसमोर फेकल्या आहेत. परकीय गुंतवणुकीच्या सोंगट्या फेकून तुम्हाला ना बनवाबनवीचा जुगार जिंकता येईल, ना महाविकास आघाडी सरकारचे श्रेय लाटता येईल, ना महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेण्यावरून तुमच्याबद्दल असलेला जनतेच्या मनातील रोष कमी होईल, अशी टीका शिवसेनेनं ( ठाकरे गट ) ‘सामना’ अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

“आकड्यांचा ‘भुलभुलैया’ तुम्हाला करायचाच असेल तर ती तुमची मर्जी. परकीय गुंतवणुकीचा सातबारा फक्त आमच्याच नावावर ही कुऱ्हाड स्वतःच स्वतःच्या पायावर मारून घ्यायची असेल तर तीदेखील तुमची मर्जी. महाराष्ट्रातील जनता सगळे ओळखून आहे. बाकी महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीतच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात नंबर वन व्हायला हवा. फक्त ‘गुजरातचा विकास म्हणजे देशाचा विकास’ असे मानणाऱ्या तुमच्या श्रेष्ठींना ते मान्य होईल का, तेवढे बघा!,” असा टोलाही ठाकरे गटानं फडणवीसांना लगावला आहे.

raj thackeray allegation on maha vikas aghadi during campging for naryan rane
जमिनींमध्ये दलाली हेच मविआ सरकारचे उद्योग; कणकवलीतील सभेत राज ठाकरे यांचा आरोप
Padsaad
पडसाद : चिपकोसारख्या आंदोलनाची गरज
bank of maharashtra
‘महाबँके’चे ७,५०० कोटींचे निधी उभारणीचे लक्ष्य; मार्च तिमाहीत निव्वळ नफा १,२१८ कोटींवर
loksatta analysis increasing sugar production in maharashtra
विश्लेषण : साखर उद्योगावर पुन्हा एकदा महाराष्ट्राची मक्तेदारी?

“…अन् असा ‘५६ इंची’ दावादेखील फडणवीसांनी केला”

“२०२२-२३ या आर्थिक वर्षात १ लाख १८ हजार ४२२ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र हे देशातील अव्वल राज्य बनले आहे, असे ‘सीनियर’ उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. जुलै ते सप्टेंबर २०२३ या तिमाहीतील या गुंतवणुकीचा आकडा म्हणे, २८ हजार ८७८ कोटी रुपये आहे तर एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांतील गुंतवणूक ६५ हजार ५०२ कोटी रुपये इतकी आहे. शिवाय महाराष्ट्रातील ही परकीय गुंतवणूक कर्नाटक, दिल्ली आणि तेलंगणा या तीन राज्यांतील एकत्रित गुंतवणुकीपेक्षाही जास्त आहे, असा ‘५६ इंची’ दावादेखील फडणवीस यांनी केला आहे,” असं ठाकरे गटानं म्हटलं आहे.

हेही वाचा : VIDEO : “राजा, महाराजांचं इंग्रजांशी संगनमत होतं”, राहुल गांधींच्या विधानावर फडणवीस म्हणाले, “हे अतिशय…”

“आधीचे सरकार कसे काम करीत नव्हते, हाच आटापिटा सुरू आहे”

“या सरकारचे सध्या फक्त एकच काम सुरू आहे ते म्हणजे, आमच्या ट्रिपल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राची गाडी सर्वच बाबतीत कशी वेगाने पळत आहे. त्याबद्दल वेगवेगळे दावे करणे, घोषणांचे पोकळ फुगे हवेत सोडणे. फक्त आमचे सरकारच कसे चांगले काम करीत आहे आणि आधीचे सरकार कसे काम करीत नव्हते, हाच आटापिटा त्यांचा सुरू असतो. वस्तुस्थिती तशी नसली तरी आधीच्या सरकारने केलेला ‘मावा’ झाकून ठेवायचा आणि त्याचेही श्रेय आपणच घ्यायचे हा ‘नागपुरी कावा’ सध्या जरा जास्तच सुरू आहे. महाराष्ट्रातील परकीय गुंतवणुकीचा जो काही डंका उपमुख्यमंत्र्यांनी पिटला तो तो याच पठडीतला आहे,” असं टीकास्र ठाकरे गटानं सोडलं आहे.

“बनवाबनवी कशाला करीत आहात?”

“महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक वाढली असेल तर कोणाला दुख होणार आहे? महाराष्ट्र देशात अव्वल झाला असेल तर वाईट वाटण्याचे कारण काय? किंबहुना, फक्त परकीय गुंतवणुकीतच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र देशात ‘नंबर वन’चे राज्य असावे असेच सगळ्यांना वाटते. प्रश्न इतकाच आहे की, ही गोष्ट आकड्यांच्या सोंगट्या फेकून साध्य कशी होईल? महाराष्ट्रात जी काही परकीय गुंतवणूक मागील काही काळात झाली त्याचे श्रेय तुम्हाला घ्यायचे असेल तर खुशाल घ्या, परंतु त्यात बनवाबनवी कशाला करीत आहात? स्वतःला नेहमी ‘पारदर्शी’ वगैरे म्हणवता ना, मग परकीय गुंतवणुकीचा तपशील, कालावधी याबाबतीतही पारदर्शक राहा,” असं ठाकरे गटानं फडणवीसांना सुनावलं आहे.

हेही वाचा : “…तर अयोध्येचा सातबाराही एखाद्या उद्योगपतीला दिला जाईल”, संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

“परकीय गुंतवणुकीचा सर्वात मोठा आकडा महाविकास आघाडी सरकारच्या काळातील”

“महाराष्ट्रातील वाढत्या परकीय गुंतवणुकीचे श्रेय महाविकास आघाडी सरकारचेही आहे हेदेखील लक्षात असू द्या. वास्तविक, त्या वेळी तर कोरोना महामारीमुळे एकूणच आर्थिक-औद्योगिक आणीबाणीची परिस्थिती होती. तरीही महाविकास आघाडी सरकारच्या काळात (२०२१-२२) राज्यात १५ हजार ४३९ दशलक्ष डॉलर्सची परकीय गुंतवणूक आली होती. मात्र तुमच्या काळात परकीय गुंतवणूक किती आली? तर १४ हजार १०६ दशलक्ष डॉलर्स! तीदेखील कोरोना जाऊन एक वर्ष सरलेले असताना. म्हणजे तुमच्यापेक्षा महाविकास आघाडी सरकार राज्यातील परकीय गुंतवणुकीबाबत अव्वल होते. हे तुम्ही मान्य करीत नसला तरी तुम्हीच दिलेले आकडे त्यातील सत्य सांगत आहेत. मागील तीन वर्षातील महाराष्ट्रातील परकीय गुंतवणुकीचा सर्वात मोठा आकडा महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहे, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा ‘आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक देशात नंबर वन झाली हो SS’ हे तुणतुणे तुम्ही कुठल्या तोंडाने वाजवीत आहात?” असा सवाल ठाकरे गटानं फडणवीसांना विचारला आहे.