रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभेची उमेदवारी मिळण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आग्रही आहेत. त्यांनी याबाबत आपली इच्छाही बोलून दाखवली आहे. पण रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून मंत्री नारायण राणे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप महायुतीकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. नारायण राणे यांना विश्वासात घेऊन ही जागा मागणार असल्याचे विधान किरण सामंत यांनी केले होते. तसेच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनाही किरण सामंत यांनी आव्हान दिले होते. यानंतर आता वैभव नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर देत उमेदवारी मिळविण्यासाठी किरण सामंत यांना नारायण राणे यांची लाचारी करावी लागत असल्याचे विधान करत डिवचले आहे.

आमदार वैभव नाईक काय म्हणाले?

“आम्ही एकनिष्ठ आहोत हे सांगायला आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही मातोश्रीबाबत निष्ठावंत आहोत आणि यापुढेही राहणार आहोत. मात्र, तुमचा बॉस दरवेळी बदलत असतो. आता तुमचा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे. तेथे तुम्ही वॉचमनगिरी करत आहात हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. आता तुम्हाला एकच सल्ला आहे, तुमचे वडील केंद्रीय मंत्री असूनदेखील तुम्हाला आतापर्यंत तिकीट मिळाले नाही. तिकीट मिळण्यासाठी ते धडपड करत आहेत. आता आपण बॉसच्या तेथे वॉचमन असल्यामुळे बॉसकडे जाऊन ते तिकीट देतात की नाही, याची एकदा खात्री करा. तसेच तिकीट मिळण्यासाठी प्रयत्न करा, तरच बॉसगिरीचा आणि वॉचमनगिरीचा फायदा होईल”, असा टोला आमदार वैभव नाईक यांनी आमदार नितेश राणे यांना लगावला.

Kirit Somaiya shinde fadnavis
“या सरकारमध्येही घोटाळा होणार होता, पण…”, सोमय्यांचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर; भाजपावरही आरोप
Jitendra-Awhad
शिंदे गटाचा ठाण्याचा उमेदवार कोण असणार? जितेंद्र आव्हाडांनी घेतलं मित्राचं नाव, म्हणाले…
what kirit somaiya Said?
“..तर ठाकरे-पवारांनी भाजपा संपवली असती”, किरीट सोमय्यांचा गौप्यस्फोट
Ashok chavan
“शिवसेना-राष्ट्रवादीने काँग्रेसची धुळधाण केलीय, मी तिकडे असताना…”, अशोक चव्हाणांचा टोला

हेही वाचा : ३० लाख युवकांना नोकरी, महिलांना वर्षाला १ लाख ते शेतीमालाला हमीभाव; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा

वैभव नाईक यांची किरण सामंत यांच्यावर टीका

“निलेश राणे यांना निवडून आणण्याआधी किरण सामंत यांना स्वत:च्या उमेदवारीसाठी किती प्रयत्न करावे लागत आहेत? राणेंची किती लाचारी करावी लागत आहे? त्यामुळे मी किरण सामंत यांना एवढेच सांगतो, ज्यांना तुम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असे म्हणत आहात ते दोनवेळा दोन लाख मतांनी पराभूत झाले आहेत. तुम्ही एकावेळी त्यांचे प्रचारप्रमुख होता. तरीही तुमच्या रत्नागिरीच्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांना मताधिक्य मिळाले नव्हते”, असा टोला वैभव नाईक यांनी किरण सामंत यांना लगावला.

वैभव नाईक पुढे म्हणाले, “शिवसेनेच्या विनायक राऊत रत्नागिरीत ४० हजारांचे मताधिक्य होते. त्याचा अंदाज तुम्हाला आल्यानंतर तुम्ही शिवसेनेत आला. खरे तर माझ्यासारख्या निष्ठावंतावर येथील लोकांनी विश्वास ठेवला आहे. पण तुम्ही जी ताकद म्हणतात ती पैशाची ताकद येथील लोकांवर चालणार नाही. याचीदेखील आम्हाला खात्री आहे. केंद्रीय मंत्री असूनही नारायण राणे यांना तिकीट मिळत नाही. त्यामुळे तुम्ही आधी लोकसभेचे पाहा”, असा खोचक सल्ला वैभव नाईक यांनी किरण सामंत यांना दिला.