पुण्यामध्ये दहीहंडीचा बॅनर लावण्यावरून झालेल्या वादात पाच जणांनी तलवारीने वार करत एका २४ वर्षीय दुकानदाराची हत्या केली आहे. अक्षय अशोक घडसी असे मृत तरुणाचे नाव आहे. सिंहगड रोडवरील माणिकबाग येथे शनिवारी पहाटे अक्षयची पाच जणांनी तलवारीने वार करत हत्या केली. अक्षयच्या वडिलांनी सिंहगड पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी निलेश चौधरी, सागर दारवटकर व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अक्षय आणि पाचही आरोपी हे एकाच भागात राहतात. त्यांच्यात दहीहंडीचा बॅनर लावण्यावरुन वाद झाला होता.

अक्षय घडसी हा किराणा दुकान चालवायचा. त्याचे धायरीत दुकान आहे. काल संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान बाहेर गेलेला अक्षय घरी परतला नाही. यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला एक तरुणाचा पेट्रोल पंपाजवळ खून झाल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटली. पोलिसांनी अक्षयच्या घऱच्यांना ही माहिती.

दहीहंदीचा बॅनर लावण्याच्या वादातून पाच जणांनी मध्यरात्री अक्षयवर तलवारीने वार करुन त्याची निर्घृण हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. आता सिंहगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पाचही आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सिंहगड रोडवरील माणिकबाग येथील नॅशनल पार्क सोसायटीमध्ये अक्षय गडशी राहण्यास होता.तर त्याचे निलेश चौधरी आणि अन्य चार मित्राशी दहीहंडी चा फ्लेक्स कोणत्या चौकात आणि त्यावर कोणाचे फोटो असावे.यावरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.तो राग मनात धरून निलेश चौधरी आणि त्याच्या बरोबर असणाऱ्या चार मित्रांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास माणिकबाग परिसरात अक्षयवर तलवारी ने सपासप वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी संबंधितवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले.