क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील क्रीडा नैपुण्य वाढावे म्हणून जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडामहोत्सव आयोजित करण्यात आला असून, अगदी कमी कालावधीत मेहनत घेऊन पीएनपीचे शिक्षक, प्राचार्य व विद्यार्थ्यांनी हा महोत्सव आयोजित केला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करावेसे वाटते, असे प्रतिपादन पीएनपी एज्युकेशनच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
रायगड जिल्हा अध्यापक महाविद्यालयीन क्रीडा व संघ व पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे बी.एड. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी वेश्वी येथील पीएनपी एज्युकेशन पटांगणात जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल, प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे बी.एड. कॉलेज अलिबाग, बापूसाहेब डी. डी. विसपुते बी.एड. कॉलेज न्यू पनवेल, नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे बी.एड. कॉलेज, नेरळ अशा एकूण ४ महाविद्यालयातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या वेळी पीएनपी एज्युकेशनच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, प्रमुख अतिथी आंतरराष्ट्रीय व छत्रपती पुरस्कार विजेते आशीष म्हात्रे, पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे बी. एड. कॉलेज, अलिबागच्या प्राचार्या रुतिषा पाटील, शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेलच्या प्राचार्या रमा भोसले, बापूसाहेब डी. डी. विसपुते बी. डी. कॉलेज- न्यू पनवेलचे प्राचार्य डॉ. नितीन प्रभुतेंडोलकर, नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे बी.एड. कॉलेज- नेरळचे प्राचार्य ज्ञानेश्वर मगर, शिक्षक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना पीएनपी एज्युकेशनच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, दोनदिवसीय आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतल्याने त्यांचे कौतुक करावेसे वाटते, असे त्या म्हणाल्या.
मंगळवारी १०० मी., २०० मी., ४०० मी., धावणे. १०० बाय ४ रिले धावणे, लांब उडी व उंच उडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, खो-खो स्पर्धा घेण्यात आल्या. १६ जानेवारी रोजी सकाळी खो-खो (मुली फायनल), व्हॉलीबॉल, थ्रो बॉल, कबड्डी अशा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम सकाळी ११ वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी सुनीता रिकामे यांच्या हस्ते होणार आहे.