लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्रातल्या बारामतीत काय होणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे अशी होणारी लढत. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे बारामतीत लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तर महायुतीकडून सुनेत्रा पवार रिंगणात असतील. नणंद विरुद्ध भावजय असा हा सामना असणार आहे. अशात आज सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बारामतीच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष

खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्या वहिनी सुनेत्रा पवार लोकसभा लढणार आहेत. या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही. गुरुवारी म्हणजेच २८ मार्चला या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या रिंगणात आमने-सामने उभ्या ठाकणार असल्याच्या चर्चा रंगल्यानंतर पहिल्यांदाच विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांची वहिनी सुनेत्रा पवार एकत्र एकाच मंचावर दिसणार आहेत.

एकाच मंचावर येणार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार आगामी लोकसभा एकमेकांच्या विरोधात लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. राजकीय वर्तुळात नणंद-भावजयीत रंगणाऱ्या या निवडणुकीच्या चुरशीची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच आता पुन्हा राजकीय वर्तुळात या नणंद-भावजयची चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे, लवकरच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एका मंचावर एकत्र दिसणार आहेत. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे संत तुकाराम महाराज बीज यानिमित्ताने एकत्र येण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा- सुनेत्रा पवारांनी अजित पवारांना दिली श्रीकृष्णाची उपमा, म्हणाल्या, “श्रीकृष्णाविरोधातही भावकी..”

बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे तुकाराम बीज साजरी केली जाते. गेली अनेक वर्ष सुप्रिया सुळे तुकाराम बीजेच्या निमित्तानं कार्यक्रमाला हजेरी लावतात. यावर्षी सुनेत्रा पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule and sunetra pawar to share the same dais in baramati rno news scj