पाचगणी-वाई रस्त्यावर पसरणी घाटात ब्रेकफेल झाल्याने चालकाचा ताबा सुटून अवघड वळणावर एक बस उलटली, या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. या बसमधून एकूण ३४ प्रवासी प्रवास करत होते. चाकण येथील सुप्रजित इंजिनिअरिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वार्षीक सहलीची ही बस आहे.

प्रतापगड-महाबळेश्वर येथे सहलीसाठी ही खासगी बस गुरुवारी येथे आली होती, बसमध्ये ३४ प्रवासी होते. सायंकाळी पावणेसातच्या दरम्यान परतीच्या प्रवासाला असताना पाचगणी-वाई रस्त्यावरील पसरणी घाटात बुवासाहेब मंदिराजवळ एका अवघड वळणावर उतारावर ब्रेकफेल झाल्याने बस रस्त्यावरच उलटली.

2024 Force Gurkha launch
Mahindra Thar चा खेळ संपणार? १० सीटर कार आणल्यानंतर फोर्सची Gurkha नव्या अवतारात देशात दाखल
Mumbai, Dead bodies of two children,
मुंबई : जुन्या मोटरीत दोन चिमुरड्यांचा मृतदेह सापडला, गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय
Rumors, firing, Hadapsar, Hadapsar latest news,
हडपसर भागात गोळीबाराची अफवा; पोलिसांची धावपळ
Horrific accident to speedy Scorpio 3 dead 5 injured in buldhana
बुलढाणा : भरधाव स्कॉर्पिओला भीषण अपघात, ३ ठार, ५ जखमी

दरम्यान, चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने बस डोंगराच्या बाजूला नेली अन्यथा बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना व जीवितहानी घडली असती. यामुळे बसमधील प्रवासांमध्ये एकच गोंधळ उडाला. अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत तर अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना वाई व पाचगणी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच वाई व पाचगणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.