कराड –  महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, अग्निवीर, आदिवासी, दलित, अल्पसंख्यांक समाजासह इतरही लोक नाराज आहेत. विकासाच्या मुद्दा सोडून जाती-जाती, समाज-समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून हिंदु-मुस्लिम ध्रुवीकरणाबाबत लोकांमध्ये चिड निर्माण झाल्याने त्याचा भाजपला  मोठा फटका बसेल अशी टीका काँग्रेसचे प्रदेश  उपाध्यक्ष, माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी केली.

लोकसभेच्या सातारा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ मुजफ्फर हुसेन यांनी रविवारी प्रचारदौरा केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे नेते झकीर पठाण या वेळी उपस्थित होते. हुसेन म्हणाले, सध्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी वातावरण आहे. हे दोन टप्प्यांमधील लोकसभा निवडणुकीच्या मतदानावरून दिसून आले.

Rajiv Shukla, bjp, claim,
“चारशेच्या दाव्याची हवा निघाली”, काँग्रेस नेते राजीव शुक्लांची भाजपवर टीका; म्हणाले, “विरोधी पक्षांना ज्याप्रमाणे…”
reasons given by Congress leaders for ignoring pm narendra modis statement about Gandhi
गांधीबाबत मोदींच्या विधानाकडे दुर्लक्ष, काँग्रेस नेत्यांनी दिली ही कारणे
mani shankar aiyar on chinese invasion in india
‘चीनने भारतावर आक्रमण केलंच नाही?’ मणिशंकर अय्यर यांचं अजब विधान; काँग्रेसने हात झटकले
Rahul Gandhi Lunch With Tejashwi Yadav
“ते न थांबता, खोटं बोलतात”; तेजस्वी यादव आणि राहुल गांधींचं एकत्र जेवण अन् मोदींवर मिश्किल टिप्पणी
bjp already has sufficient numbers to form the government says hm amit shah zws
सरकार बनवण्यासाठी पुरेसे संख्याबळ; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दावा, विरोधी पक्षाचा निर्णय जनतेकडे
Priyanka Gandhi asked Prime Minister Narendra Modi why there is no prosperity in people lives
जनतेच्या जीवनात समृद्धी का नाही? पंतप्रधानमोदी यांना प्रियंका गांधी यांचा सवाल
Rahul Gandhi allegation that the Prime Minister announced the overthrow of the Himachal government
हिमाचल सरकार पाडण्याचे पंतप्रधानांकडूनच जाहीर; राहुल गांधी यांचा आरोप
pm narendra modi slams congress over vote jihad allegations
‘व्होट जिहाद’चा काँग्रेसचा डाव! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघाती आरोप

भाजपच्या ‘अबकी बार चारसौ पार’चा आकडा आता निम्म्यावर आला आहे. त्यामुळे संयम सुटलेले पंतप्रधान प्रचारसभांमध्ये खालच्या पातळीवर बोलत आहेत, हे कोणालाही आवडलेले नाही. तसेच निवडणूक आयोगाने सांगितलेले मतदानाचे आकडे वाढवून सांगणे हे चुकीचे आहे. निवडणूक आयोगाच्या निकालावर भाष्य करणे योग्य नसून  हा निवडणूक आयोगाचा अपमान असल्याचा आरोप हुसेन यांनी केला.

संपूर्ण राज्यभरात प्रचाराच्या अनुषंगाने फिरताना इंडिया आघाडीला  चांगले वातावरण असल्याचे दिसून येत आहे. सातारा मतदारसंघातही शशिकांत शिंदे यांना पोषक वातावरण असून ते चांगल्या मतांनी निवडून येतील. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आहे. त्याचा फायदा नक्कीच शशिकांत शिंदे यांना झाल्याखेरीज राहणार नाही.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> शरद पवार माढ्याचा एकही प्रश्न सोडवू शकले नाहीत-फडणवीस

कराडमधील सभेत पंतप्रधानांनी कर्नाटकातील मुस्लिमांना काँग्रेसने एका रात्रीत ओबीसीचे आरक्षण आणि ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणावर दरोडा टाकल्याची टीका केली आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, नरेंद्र मोदी फक्त ‘सबका साथ सबका विकास’ म्हणतात. मात्र, त्यांच्या कृतीतून ते दिसून येत नाही. जर काँग्रेसने कर्नाटकात मुस्लिमांना ‘ओबीसी’मधून आरक्षण दिले असेल, तर ते घटनेनुसारच दिले असेल. मात्र, पंतप्रधान डिक्टेटरसारखे वागतात, हे यावरून दिसून येते. सर्वसामान्यांचा विकास होणे महत्त्वाचे आहे. सर्वांना पुढे घेऊन जाणे आपली जबाबदारी आहे. काँग्रेसने सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतली आहे. नरेंद्र मोदींनी तर काँग्रेसच्या जाहीरनामाला मुस्लिमांचा जाहीरनामा म्हटले आहे. यावरून समाजा-समाजात द्वेष पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न लक्षात येतो. महाराष्ट्रासह तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ येथेही भाजपला अपेक्षित यश मिळणार नाही. गतखेपेचा ३०३ जागी विजयाचा आकडा भाजपला पुन्हा गाठणे शक्य नसल्याचा दावा मुजफ्फर हुसेन यांनी या वेळी केला.