कराड:  दारू पिऊन घरच्यांना वारंवार घाणेरडे बोलणे, शिव्या देणे व वहिनीवर वाईट नजर ठेवून चारित्र्यवर संशय घेणाऱ्या आणि दारूला पैसे देत नाहीत म्हणून आई-वडिलांना मारहाण करून,  पुतण्याला आणि वहिनीला मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या पोटच्या मुलीच्या त्रासाला कंटाळून आई-वडिलांनी मुलगी व नातवाच्या साथीने त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना माण तालुक्यातील शिरवली येथे घडली. दहिवडी पोलिसांनी केवळ दोनच तासात गुन्ह्याचा छडा लावला.

दादा रामचंद्र जगदाळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिरवली गावाच्या यात्रेनिमित्त घरी आलेली मयताची बहीण, मयताचा अल्पवयीन पुतण्या यांच्यासोबत मयताच्या आई-वडिलांनी  मयत दादा जगदाळे हा दारू पिऊन घरी येऊन झोपल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून हातपाय पकडुन दोरीने गळा आवळून त्याचा खून केला.

kalyan shivsena new appointment
कल्याणमधील ठाकरे गटाच्या नव्या नेमणुका, सामान्य शिवसैनिकांमध्ये नाराजी
vasai 3 sisters rape marathi news
नालासोपार्‍यात ३ अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार, ४ जणांना अटक
people vote for change against modi in lok sabha election
समोरच्या बाकावरुन : नव्याच्या नावाखाली ‘तेच ते’ आणि ‘तेच ते’
man killed son by stuffing bunch of notebook pages in his mouth
शहापूर : तोंडात वहीच्या पानांचा बोळा कोंबून पित्याकडून मुलाची हत्या
bjp leader samarjeetsinh Ghatge cheated
कोल्हापुरात भाजप नेत्यांच्या पत्नीस २० लाखाचा गंडा
Gauri Chandrasekhar Nayak Lady Bhagirath of Karnataka
गौरी चंद्रशेखर नायक : कर्नाटकातल्या लेडी भगीरथ…
pune accident
पोर्श अपघातानंतर क्लब मालकांना आली जाग, पुण्यातील उद्योजकाने सांगितली पब्समधील सद्यस्थिती
Rural Medical Center, transfer a organization from old to new generation, daughter in law, mother in law,
सांधा बदलताना : हस्तांतरण..

दहिवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत अज्ञाताविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला होता. या खुनाचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान असतानाच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपासाची चक्रे गतिमान करत अवघ्या दोन तासात संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा >>> सोलापूरचा पारा उच्चांकी ४४.४ अंशांवर, शिक्षकाचा उष्माघाताने मृत्यू

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, रात्रीच्या वेळी कुत्रांच्या भूकण्याने वडील घराबाहेर आले. त्यावेळी त्यांना आपला मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत दिसला. त्यावेळी तिथून चार ते पाच लोक पळून गेले असल्याचे  सांगत संबंधित संशयितांनी खुनाचा बनाव रचला. त्यामुळे त्यांचे सांगणे व घटनास्थळाची परिस्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याचा पोलिसांचा संशय बळावला. यावर सपोनि अक्षय सोनवणे यांच्यासह पोलिसांनी घरात जाऊन पाहणी केली असता, मयताचा मोबाईल घरात होता. एकंदरीत प्रकार बघून पोलिसांनी संबंधितांवर प्रश्नांची सरबत्ती करत पोलिसीखाक्या दाखवताच नेमकी वस्तुस्थिती समोर आली.

खून तरुण हा दारू पिऊन घरच्यांना वारंवार घाणेरडे बोलणे, शिव्या देणे व मयताची वहिनी वर वाईट नजर ठेवून चारित्र्यवर संशय घेत होता. दारूला पैसे देत नाहीत म्हणून आई-वडिलांना मारहाण करून  पुतण्याला आणि वहिनीला मारून टाकण्याची धमकी देत होता, त्यामुळे सततच्या या त्रासाला कंटाळून शिरवली यात्रेनिमित्त घरी आलेली मयताची बहीण, मयताचा अल्पवयीन पुतण्या यांच्यासोबत मयताच्या आई-वडिलांनी आपला मद्यपी मुलगा दादा रामचंद्र जगदाळे हा दारू पिऊन घरी येऊन झोपल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून हातपाय पकडुन दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. याप्रकरणी मयत व्यक्तीचे वडील रामचंद्र ज्ञान जगदाळे, आई कुसुम रामचंद्र जगदाळे, मयताची बहिण शैला सचिन जाधव आणि मयताचा अल्पवयीन पुतण्या यांनी संगनमताने खून केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.