वाई : देशात सध्या सूडाचे राजकारण सुरू आहे. कधी नाही तो देश मोठ्या दहशतीत आणि दबावात आहे. मोदींनी दहा वर्षे आधी सत्तेत येताना दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण केलेले नाही. त्यामुळे संपूर्ण देशात त्यांच्या विरोधात रोष आहे. सर्वसामान्यांसाठी तळमळ असणारा अखंडपणे यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्श नुसार सर्वसामान्यांसाठी कष्ट करणाऱ्या शशिकांत शिंदे यांना साताऱ्यातून विजयी करा असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी साताऱ्यातील सभेत केले महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आपचे खासदार संजय सिंह श्रीनिवास पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण फोजिया खान अनिल देशमुख राजेश टोपे सचिन अहिर बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले ही ऐतिहासिक सभा आहे. देशात सध्या संघर्षाची परिस्थिती आहे. मोदींच्या विरोधात बोलणाऱ्या वर थेट कारवाई केली जाते. त्यांना तुरुंगात टाकले जाते. मोदींनी महागाई कमी केली नाही. शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. सध्या मोदींमुळे देशात संघर्षाची स्थिती आहे. त्याला सर्व देशाला सामोरे जावे लागणार आहे. मोदींनी देशासमोर मोठी आव्हाने उभी केली आहेत. त्याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावाच लागणार आहे. मोदींनी आजपर्यंत देशाला खोटं सांगून चार हजार किमीचे देशाची सीमा चीनने गिळंकृत केली आहे. सरकारची चुकीची धोरणे, वाढती महागाई आणि सत्तेचा आलेला उन्माद यातून सर्वसामान्यांचे जगणं मुश्किल केले आहे.

आणखी वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वैश्विक नेतृत्व, त्यांना ताकद देण्यासाठी उदयनराजेंना निवडून द्या- देवेंद्र फडणवीस

राजकारण उध्वस्त करण्याचं काम त्यांनी केले. लोकशाही मजबूत करण्याचे कोणतेही धोरण सरकारकडे नाही. लोकांच्या मनामध्ये नसलेल्या गोष्टी आणून त्या देशाचा कारभार आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वसामान्यांचे नेतृत्व करणारे शाशिकांत शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे त्यांनी सांगितले

शशिकांत शिंदे म्हणाले, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. अशा कार्यकर्त्याला शरद पवारांनी संधी दिली आहे. माझ्याविरोधात करण्यात येणारे आरोप चुकीचे आहेत. हे सर्व निवडणुकीच्या साठी होत आहे. सातारा जिल्ह्याच्या विकासात बदल घडवण्याची ताकद माझ्यात आहे. हा संघर्षाचा काळ आहे नेत्यांच्या मागे खंबीर उभा राहून भूमिका घेणारा मी कार्यकर्ता आहे. माझ्यावर टीका सहन करतो पण शरद पवारांच्या वर बोललेले सण करणार नाही. पक्षाच्या अनेक नेत्यांचा विरोध असताना मी उदयनराजेंचा प्रचार करत होतो. त्यांच्या प्रचाराची धुरा अंगावर घेतली होती. मदत केलेल्या ची जाणीव ठेवली पाहिजे असे ते म्हणाले. शशिकांत शिंदे म्हणाले मला खोट्या आरोपात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे.

आणखी वाचा-“पटलं नाही तर नव्याने निर्माण करा, आहे ते ओरबाडू नका”, राज ठाकरेंचं सूचक विधान; नेमका रोख कुणाकडे?

यावेळी बळीराजा संघटनेचे पवार यांना आसूड भेट दिला. या भेटीचा उपयोग येथे नसून याचा उपयोग करण्यासाठी मला दिल्लीला जावे लागेल. बळीराजा संघटनेने दिलेली भेट उपयोगी पडेल असे पवार म्हणाले. या सभेने त्यांच्या पावसातील सभेच्या आठवणी जागा केल्या. यावेळी खासदार संजय सिंह श्रीनिवास पाटील पृथ्वीराज चव्हाण अनिल देशमुख राजेश टोपे बाळासाहेब पाटील भारत पाटणकर आदींची भाषणे झाली. यावेळी शिक्षकांत शिंदे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. जिल्हा परिषद मैदान पूर्ण भरले होते.