सांगली : महाविकास आघाडीतील सांगलीच्या जागेबाबत आग्रही असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची समजूत काढण्यासाठी आणि प्रचाराची घडी बसविण्यासाठी शिवसेनेचे खा. संजय राउत शुक्रवारी सांगलीत येत असून तीन ते चार दिवसाच्या सांगली दौर्‍यामध्ये नाराज मित्र पक्षांच्या नेत्यांची ते भेट घेणार आहेत.ठाकरे शिवसेनेने सांगली मतदार संघासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर  केली असून याबाबत पुन्हा चर्चा करण्यात येणार नाही असे सांगण्यात आले असले तरी काँग्रेसनेही आता उमेदवारीसाठी ताठर भूमिका घेतली आहे. यामुळे मविआच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या पेचामुळे प्रचाराला अद्याप गती मिळालेली नाही.

हेही वाचा >>> राहुल गांधी १३ एप्रिल तर प्रियंका गांधी १५ एप्रिलला विदर्भात, ‘या’ ठिकाणी होणार जाहीर सभा

Sharad Pawar
शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडेंविरोधात उभा केला तगडा उमेदवार
rohit pawar anaji pant marathi news
‘आधुनिक अनाजी पंतांनी आमचं घर फोडलं, तीन-चार पवार तिकडे गेले, पण…’, रोहित पवारांचे रोखठोक प्रतिपादन
Udayanraje Bhosale, sharad pawar
“माझ्या बारशाचं जेवण…”, शरद पवारांच्या कॉलर उडवण्याच्या कृतीवर उदयनराजेंची प्रतिक्रिया
ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?

कोणत्याही स्थितीत सांगलीतील पैलवान पाटील यांची उमेदवारी मागे घेतली जाणार नाही अशी भूमिका पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतली असून सांगलीवर चर्चाच होउ शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावर काँग्रेसचे जिल्हा व प्रदेश पातळीवरील नेतेही आक्रमक झाले असून पर्यायासाठी दिीतील वरिष्ठ नेत्यांचा अंतिम निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत. अशा  स्थितीत मविआचा एकत्रित प्रचार सुरू व्हावा यासाठी खा. राउत हे सांगली दौर्‍यावर येत असून या दौर्‍यात ते काँग्रेस नेत्यांची समजूत  काढणार असल्याचे आणि एकत्रित प्रचारासाठी कार्यरत  होण्याची विनंती करणार असल्याचे सांगण्यात आले. दौर्‍यादरम्यान, खा. राउत सहा विधानसभा मतदार संघातील  प्रमुख कार्यकर्त्यांंच्या घरी जाणार असल्याचे सांगण्यात आले. खा. राउत यांचा सांगलीचा दौरा निश्‍चित असला तरी तपशील अद्याप निश्‍चित करण्यात आलेला नसल्याचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी सांगितले.