शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या राज्यभर कुटुंब संवाद दौरा करत आहेत. याअंतर्गत आज (१३ फेब्रुवारी) अहमदनगरच्या श्रीरामपूरमधील भगतसिंग चौकात उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख टाळत देशात हुकूमशाहीचा व्हायरस पसरला असल्याचं वक्तव्य केलं. उद्धव ठाकरे सभेला उपस्थित जनतेसमोर म्हणाले, आपण गेले काही दिवस या कुटुंब संवाद दौऱ्याच्या माध्यमातून सातत्याने भेटत आहोत. तुम्हाला हुकमशाहीच्या व्हायरसची जाणीव करून देण्यासाठी मी इथे उभा राहतोय.

उद्धव ठाकरे म्हणाले, हा कुटुंब संवाद दौरा आहे. आता कुटुंब संवाद म्हटल्यावर कुटुंबाची काळजी घेणं आलंच. करोना काळात आपण ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ ही संकल्पना राबवली होती. या योजनेला सर्वांनी साथ दिली. आता करोना नाहीये, परंतु, एक वेगळा व्हायरस (विषाणू) देशात पसरतोय. एकाधिकारशाहीचा आणि हुकूमशाहीचा व्हायरस देशभर पसरू लागला आहे. करोनाच्या बाबतीत एक नियम होता… मास्क लावा, हात धुवा आणि एकमेकांपासून दोन हात लांब राहा. तशीच विनंती तुम्हाला करण्यासाठी मी इथे आलो आहे. देशात हुकूमशाहाचा व्हायरस पसरतोय, त्या व्हायरसपासून दोन हात दूर राहा. तसेच त्या व्हायरसच्या हात धुवून मागे लागा. आपल्याला त्याला महाराष्ट्रातून संपवून टाकायचं आहे.

Lok Sabha Elections 2024 Narendra Modi
एका दगडात दोन पक्षी, मोदी आणि भाजपा दोघांनी ४०० पार जागांचा अर्थच बदलला
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
baramati lok sabha seat, supriya sule, pawar surname, jitendra awhad, sharad pawar, ajit pawar, jitendra avhad criticise ajitdada, pawar surname, sunetra pawar, thane, bjp,
जितेंद्र आव्हाड म्हणाले, सुप्रिया सुळेंना राजकीय फायदा घ्यायचा असता तर…
Prime Minister Narendra Modi statement on terrorists
दहशतवाद्यांचा त्यांच्या भूमीतच खातमा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

ठाकरे गटाचे प्रमुख म्हणाले, अशोक चव्हाण भाजपात गेल्याने किंवा इतर कुठला नेता भाजपात गेल्याने त्यांच्या मूळ पक्षाला नव्हे तर भाजपा आणि आरएसएसच्या निष्ठावंतांना धक्का बसतो. आज त्यांना असाच एक मोठा धक्का बसला आहे. एखाद्या पक्षातला नेता दुसरीकडे गेला की त्या पक्षाला धक्का बसला असं म्हटलं जातं. परंतु, असे धक्के भाजपाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, निष्ठावंताना बसतात. कारण आपण ज्यांच्याविरोधात लढलो, ज्यांच्यावर आरोप केले, ज्यांना भ्रष्टाचारी म्हटलं, तेच लोक आता आपल्या पक्षात आले आहेत. हे पाहून भाजपाच्या निष्ठावंतांना धक्का बसणारच. इकडचे नेते तिकडे जाणे हा महाविकास आघाडीला नव्हे तर भाजपाला धक्का आहे. शिवसेनेला तर कशाचाच धक्का बसत नाही.

हे ही वाचा >> अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर एकनाथ खडसेंची फेसबूक पोस्ट व्हायरल; म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून मी…”

उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना इतरांना धक्के देत आली आहे. मिंधेंसारखे अनेकजण आले आणि गेले. प्रत्येक वेळा पक्षाला नवी पालवी फुटली आणि शिवसेनेचा वृक्ष हिरवागार होऊन गेला आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे पानगळ व्हायला हवी. सडलेली पाने झडायला पाहिजेत. ती सडलेली पानं आता झडतायत. आता नवी पानं फुटू लागली आहे. शिवसेनेला धुमारे फुटू लागले आहेत.