२२ जानेवारीला प्रभू श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त देशात दिवाळी साजरी करायला हरकत नाही. पण, १० वर्षांत देशाचं दिवाळं निघालं आहे, त्याबद्दल चर्चा होणं गरजेचं आहे, असं आव्हान शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलं आहे. तसेच, २२ जानेवारीला काळाराम मंदिरात येण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण देणार आहोत, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. ते ‘मातोश्री’ येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “२२ जानेवारीला नाशिकमधील काळाराम मंदिरात प्रभू श्री राम मंदिराचं दर्शन घेत गोदावरी तीरी आरती करणार आहोत. २३ जानेवारीला शिवसेनेचं शिबीर आणि जाहीर सभा होणार आहे.”

Shahu Vichar Darshan Padyatra, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj, Rajarshi Shahu Maharaj s Centenary Golden Jubilee , Centenary Golden Jubilee, Rajarshi Shahu Maharaj Kolhapur, Kolhapur, dr jai singh rao pawar,
शाहू विचार दर्शन पदयात्रेद्वारा विविधांगी कार्याचा जागर
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
avimukteshwaranand saraswati
VIDEO : “गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देऊ”, नववर्षानिमित्त शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी व्यक्त केला संकल्प!

“सोमनाथ मंदिराची प्राण प्रतिष्ठापणा राजेंद्र प्रसादांच्या हस्ते”

“अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराच्यावरती बाबरी मशिद बांधण्यात आली होती. तसेच, सोमनाथाच्या मंदिराचं अनेकवेळा विध्वंस करण्यात आला होता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेऊन सोमनाथाच्या मंदिराचं पुर्ननिर्माण केलं. मात्र, सोमनाथ मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापण सोहळ्याला वल्लभभाई पटेल यांचं निधन झालं होतं. तेव्हा सोमनाथ मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापण सोहळ्याला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना आमंत्रित केलं होतं. त्यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठापणा झाली होती,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

“श्री राम प्राण प्रतिष्ठापण सोहळा हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न”

“वर्षानुवर्षे प्रभू श्री राम मंदिरासाठी चाललेल्या लढ्याला अंतिमत: सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला. श्री राम प्राण प्रतिष्ठापण सोहळा हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना आमंत्रण द्यावं आणि प्राण प्रतिष्ठापणा त्यांच्या हस्ते व्हावी. केंद्र सरकार राष्ट्रपतींना आमंत्रण देईल का माहिती नाही. पण, २२ जानेवारीला काळाराम मंदिरात येण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करत आहोत,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“श्री राम मंदिर व्हावं हे लाखो भक्तांसह माझीही इच्छा”

“मी कडवट हिंदुत्ववादी आहे. श्री राम मंदिर व्हावं हे लाखो भक्तांसह माझीही इच्छा आहे. श्री राम मंदिरासाठी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली भूमिका जनतेला माहिती आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.