वाई: खासदार उदयनराजेंनी बाय हार्ट शिवेंद्रसिंहराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उदयनमहाराजांच्या आर्शिवादाने मला दहा हत्तीचे बळ आले अशी प्रतिक्रिया शिवेंद्रसिंहराजें भोसले यांनी दिली.

मागील काही वर्षात छत्रपती घराण्यातील खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यामध्ये एवढे वाद आरोप प्रत्यारोप झाले. दोघांमध्ये सतत पत्रकबाजी, टीकाटीप्पणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत होते. दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. काही महिन्यापूर्वी दोघांची विकास कामांची एकमेकांविरोधात नारळ फोडण्याची स्पर्धा सातारकरांनी पाहिली होती. असे यापूर्वीही ते दोघे व्यासपीठावर अनेकदा एकत्र आले परंतु अशी गळाभेट नव्हती. हे सर्व सातारकरांनी पाहिले होते. त्यानंतर हे दोघे एकत्र येतील असे स्वप्नात सुद्धा कोणा सातारकरांना वाटले नसेल.

परंतु शनिवारी सकाळी बगाड यात्रेच्या ठिकाणी खासदार उदयनराजे पत्रकारांना बोलले, माझा भाऊ आहे. घरी जावून शुभेच्छा देणार असे सांगितल्याप्रमाणे तेथून थेट आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या निवासस्थानी पोहचले अन् त्यांनी हटके स्टाईलने त्यांना शुभेच्छा दिल्या. मोठ्या भावाच्या हाताने शिवेंद्रसिंहराजांची पप्पी घेतली. वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. गळाभेट घेतली.

आणखी वाचा-सातारा: ‘काशीनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात बावधनच्या भैरवनाथाच्या बगाड मिरवणूक

शुभेच्छा देताना खासदार उदयनराजे म्हणाले, त्यांनी फार मोठं व्हावं. लाँग लाईफ, लॉट्स ऑफ लव्हृ लॉट्स ऑफ सक्सेक्स. त्याच्याकरता जे काय करावे लागेल ते मी करणार आहे. धिस नॉट पॉलिटीकल. आयुष्यात जे आजपर्यंत करत आलो आहे ते करणार. आज जे चाललंय त्याकरता काळाची गरज आहे. लहानपणाचे फोटो जर बघितले तर याच्या पायात मी काकींचा मार खाल्ला आहे. अनावधनाने माझ्याकडून चुकले असेल तर माफी मागणार नाही आज दिलगीरी मी व्यक्त करतो. जिल्ह्याचे त्यांनी बघावे आणि राज्याचे आम्ही बघावे.

यानंतर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आज उदयन महाराज येथे आले. त्यांनी शुभेच्छा दिल्या. राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात. सातारच्या राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ ते आहेत. नक्कीच त्यांचा आर्शिवाद हा मला दहा हत्तीच बळ देणारा आहे, असे मला तरी वाटते. आम्ही आधीच सांगितले आहे. लोकसभेच्या निवडणूकीत भाजपाच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर आहोत आणि कायम रहाणार आहे. लवकरच निर्णय वरुन जो काय असेल तो जाहीर व्हावा म्हणजे कामाला लागता येईल. अजून त्यांचे तळ्यात मळ्यात आहे. त्यांचच काय ते एकदाच फायनल करावे. माझ काय मी सातारा आणि जावळीपुरता मर्यादीत आहे. त्यांनीच दिल्लीतून शिक्कामोर्तब करुन आणावे म्हणजे आम्हाला प्रचाराला लागायला बरे, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.