बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन आता अनुराग कश्यपच्या ‘युद्ध’ या काल्पनिक मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे, या मालिकेत अमिताभ बच्चन मेकअपविना दिसणार असल्याचे समजते.
अमिताभ ‘युधिष्ठिरा’च्या भूमिकेत
अनुराग कश्यपने या मालिकेत अमिताभ यांना ‘मेकअपविना’ सादर करण्याचा निर्णय घेतला आणि मालिकेशी निगडीत सर्वांनी त्याला होकार देखील दिला.
“मालिकेतील दृष्यांमध्ये जिवनातील वास्तविकता दाखविण्याची गरज लक्षात घेता मालिकेत केंद्रस्थानी असलेला ‘युद्धिष्ठिर’ही वास्तविक असावा या विचारातून कोणताही मेकअप न करता पात्र साकारले जावे असा अनुरागने निर्णय घेतला. हा घटक मालिकेसाठी उपयुक्त ठरले असे मलाही वाटते” असे खुद्द महानायक अमिताभ यांनी म्हटले आहे.
पाहाः अमिताभ यांच्या ‘युद्ध’ मालिकेचा प्रोमो
अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’चे नवे पर्वही लवकरच सुरू होणार आहे. मात्र, यावेळेस बीग बी पूर्णपणे नव्या रुपात छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. युद्ध मालिकेत अमिताभ बच्चन युद्धिष्ठिर नावाच्या उद्योजकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्याबरोबर नवाजुद्दिन सिद्दीकी आणि अभिनेत्री सारिका यांच्या या मालिकेत महत्वाच्या भूमिका आहेत. ‘युद्ध’ मालिका जुलैच्या मध्यापर्यंत सोनी वाहिनीवर सुरू होण्याची शक्यता आहे.