25 October 2020

News Flash

Priya Varrier case: प्रिया वरियरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

या गाण्यामुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्याचे आरोप करण्यात आले होते

प्रिया प्रकाश वरियर

‘उरु अदार लव्ह’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियरविरोधात हैदराबाद आणि औरंगाबादमध्ये तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर प्रियाने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेत त्वरित सुनावणी करण्याची मागणी केली होती. आता सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय देत प्रियाला दिलासा दिला आहे.

प्रियाविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व खटल्यांवर स्थगिती आणत पुढील सुनावणी होईपर्यंत तिच्याविरोधात कोणतीच फौजदारी कारवाई करण्यात येणार नसल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. तेव्हा आता यापुढील सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट कोणता निर्णय देईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

वाचा : प्रियाच्या व्हायरल गाण्याचे गीतकार आज करत आहेत जनरल स्टोअरमध्ये काम

‘मानिक्य मलरया पूरवी’ या व्हायरल गाण्यामुळे प्रकाशझोतात आलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया आणि तिच्या आगामी ‘ओरू अदार लव्ह’ या मल्याळम चित्रपटाच्या निर्माते, दिग्दर्शकांविरोधात तेलंगणा आणि महाराष्ट्रात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेल्या या गाण्यावर आक्षेप घेत एका विद्यार्थ्याने हैदराबादमध्ये दिग्दर्शक ओमर लूलूविरोधात सर्वप्रथम तक्रार दाखल केली होती. या गाण्यामुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्याचे तक्रारीत म्हटले होते.

‘मानिक्य मलरया पूवी’ हे गाणे फार वर्षांपूर्वी लिहिण्यात आले होते. पारंपरिक मुस्लिम गाणे म्हणून ते गाणे ओळखले जायचे. मोहम्मद पैगंबर यांची पहिली पत्नी खदीजा बिंत ख्वालिद यांच्या स्वभावगुणांचं वर्णन या गाण्यात केलं आहे. पण, भाषांतराच्या दृष्टीने पाहिले असता गुगल ट्रान्सलेटरवर मात्र मोहम्मद पैगंबर यांच्या पत्नीविषयी काही चुकीची माहिती समोर येत असल्यामुळेच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्याचे पाहायला मिळाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 12:29 pm

Web Title: actress priya prakash varrier manikya malaraya poovi song case supreme court stayed all the cases pending against her
Next Stories
1 PHOTO : ‘अॅपल’च्या जाहिरातीवर झळकणारा रहमान पहिला भारतीय सेलिब्रिटी
2 मलाइकाचं चाललंय काय?
3 अमृताला लागलं अल्लाउद्दीन खिल्जीचं वेड!
Just Now!
X