झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. गेली जवळपास दीड वर्षे ही मालिका चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील कलाकारांचं ऑन स्क्रीन बॉण्डिंग तर प्रेक्षक टीव्हीवर पाहतच असतात; पण त्यांचं ऑफ स्क्रीन बॉण्डिंग खूप खास आहे.

तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, अमृता रावराणे, एकता या अभिनेत्री सेटवर अनेकदा धमाल मस्ती करताना दिसतात. मेकअप रूममध्ये डान्स व्हिडीओज, रील्स शेअर करीत त्या चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतात. अभिनेत्रींच्या या रील्स अनेकदा चर्चेत असतात, अशातच आता या कलाकारांचा एक मजेशीर व्हिडीओ एकतानं शेअर केला आहे. सध्या इंटरनेटवर एका कार्टूनरूपी चेटकिणीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. याचं डायलॉगवर आता ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे, एकता व अमृता यांनी व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या नारकर आणि अमृता अभिनय करतायत; तर एकता आणि तितीक्षा त्यांच्यासाठी डायलॉग बोलताना दिसतायत.

Saatvya Mulichi Saatvi Mulgi actress Titeeksha Tawade aishwarya narkar and other actress funny reel viral
“एकापेक्षा एक नमुने…”, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील अभिनेत्रींचा कॉमेडी व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले…
Aishwarya Narkar answer to those who said to off air the serial Satvya Mulichi Satvi Mulgi
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका बंद करा म्हणणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांचं चोख उत्तर, म्हणाल्या, “मालिकेवर १०० कुटुंब…”
aishwarya narkar answer to netizen who troll avinash narkar dance
Video: अविनाश नारकरांचा नेटकऱ्यांना खटकला डान्स, ऐश्वर्या नारकर स्पष्टच म्हणाल्या, “तो…”
Aishwarya Narkar shared new dance video netizens talk about avinash narkar new look
Video: “खूपच भारी दिसतायत…”, अविनाश नारकरांच्या डान्स नव्हे तर नव्या लूकने नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष, म्हणाले…
aishwarya and avinash narkar dances on old bollywood song
१७ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
Navri Mile Hitler La femme raqesh Bapat vallari viraj Sharmishtha Raut tejas desai dance on nacha ga ghuma song
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील एजे-लीलाचा ‘नाच गं घुमा’ गाण्यावर जबरदस्त डान्स, सोबतीला होते निर्माते; पाहा व्हिडीओ

हेही वाचा… ठरलं तर मग: “सरांच्या मनात माझ्याविषयी प्रेम…”, अर्जुनच्या प्रेमात पडलेली सायली होणार कुसुमसमोर व्यक्त; प्रोमो पाहून चाहते म्हणाले, “फालतूगिरी…”

अभिनेत्रींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. “तुम्हीसुद्धा लिली, दीदी किंवा परी आहात का?” असं कॅप्शन एकतानं या व्हिडीओला दिली आहे. अभिनेत्रींच्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स आल्या आहेत.

एका चाहत्यानं कमेंट करीत लिहिलं, “केतकीकाकू फूल फॉर्ममध्ये आहेत.” तर दुसऱ्यानं लिहिलं, “किती मजा करता तुम्ही लोक.”

हेही वाचा… गुड न्यूज दिल्यानंतर पहिल्यांदाच दिसला दीपिका पदुकोणचा बेबी बंप; अभिनेत्रीचा अनसीन फोटो व्हायरल

एका नेटकऱ्यानं मालिकेविषयी राग व्यक्त करीत कमेंट केली आहे. “तुमच्या हावभावांसारखीच तुमची मालिका झाली आहे. आधी आम्ही न चुकता, तुमची मालिका पाहायचो; आता नाही पाहत. चांगल्या मालिकेची तुम्ही माती केली. आटोपतं घ्या आता.” असं एका नेटकऱ्यानं कमेंट करीत लिहिलं.

हेही लाचा… ठरलं तर मग: …अन् अर्जुन चैतन्यच्या कानाखाली मारतो, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य साक्षीला सांगितल्यामुळे अर्जुनचा राग अनावर, पाहा प्रोमो

दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमध्ये तितीक्षा तावडे नायिकेची भूमिका साकारत आहे; तर ऐश्वर्या नारकर या खलनायिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळतायत. त्याव्यतिरिक्त या मालिकेत अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही निर्णायक भूमिका आहेत.