News Flash

#MeToo : तिच्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर करत सुशांत सिंग राजपूतने फेटाळले आरोप

माझी बदनामी करण्यासाठी माझ्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत असं म्हणत सुशांतनं आपली बाजू मांडली आहे

सुशांत सिंग राजपूत

बॉलिवूडमधल्या ‘मी टू’ मोहिमेमुळे अनेक बड्या कलाकारांचं पितळ उघडं पडलं आहे. दिवसेंदिवस यात नवी नावं समोर येत आहेत अशातच आता सुशांत सिंह राजपूतचंही नाव समोर आलं आहे. सुशांतनं नवोदित अभिनेत्रीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला यामुळे अस्वस्थ झालेली नवोदित अभिनेत्री संजना सांघवी सेटवरून निघून गेली अशा चर्चा होत्या. सुशांत आणि संजना ‘फॉल्ट इन अवर स्टार’च्या रिमेकमध्ये काम करत आहेत. मात्र संजनानं सुशांतची तक्रार केल्यानंतर चित्रीकरण थांबवण्यात आल्याचं म्हटलं जातं होतं. अनेकांनी सुशांतवर सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप टीका केली. मात्र सुशांतनं स्वत:ची बाजू मांडत आता संजना आणि त्याच्यामध्ये झालेल्या संवादाचे स्क्रीनशॉट सार्वजनिक केले आहेत.

‘किजी और मैनी’ या चित्रपटात सुशांत आणि संजना एकत्र काम करत आहेत. चित्रीकरणादरम्यान सुशांतनं संजनाशी वारंवार लगट करण्याचा प्रयत्न केला असे आरोप त्याच्यावर आहे. तसेच संजनानं अशा प्रकारची तक्रारही केली असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरल्या. त्यामुळे अर्थातच सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात रोष सहन करावा लागला. मात्र सुशांतनं संजनासोबत केलेले आपले खासगी चॅट त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.

‘हे चॅट्स वाचून तुम्हाला सत्य कळेलच. खरं तर खासगी चॅट सार्वजनिक करणं पूर्णपणे चुकीचं आहे. पण, मला एवढंच सांगायचं आहे की माझ्यावरचे आरोप बिनबुडाचे आहेत आणि हे चॅट्स वाचून खरं -खोटं सर्वांना कळलं असेल’ असं सुशांतनं ट्विट करत म्हटलं आहे. ‘मी कोणत्याही महिलेची असभ्य वर्तन किंवा लगट करण्याचा प्रयत्न केला नाही. माझी बदनामी करण्यासाठी माझ्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत असं म्हणत सुशांतनं आपली बाजू मांडली आहे.’

सुशांतनं असभ्य वर्तन केल्यानं त्याच्या ट्विटर अकांऊटवरची ‘ब्ल्यू टीक’ ट्विटरनं काढून घेतली असंही म्हटलं जातं होतं. मात्र ‘५ सप्टेंबरपासून माझ्या ट्विटर अकाऊंटवर ‘ब्लू टिक’ नाही ‘असं म्हणत सुशांतनं सर्व आरोप खोटे ठरवले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाबड़ा यांनी देखील सुशांतची बाजू घेतली आहे. ‘मी सुशांतच्या बाजूनं आहे स्वत:च्या स्वार्थासाठी कोणीतरी सुशांतची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. सेटवर असा कोणताही प्रकार घडला नाही’ असं छाबडा यांनी स्पष्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 10:26 am

Web Title: after sexual harassment claim sushant singh rajput post personal chat with co actor on social media
Next Stories
1 ‘तानाजी’ चित्रपटात सलमान साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका?
2 मैत्रीवर भाष्य करणारा ‘व्हॅनिला…’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
3 माझ्यावरील आरोप बिनबुडाचे, नाना पाटेकरांचं ‘सिंटा’कडे स्पष्टीकरण
Just Now!
X