News Flash

बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये जाणं का टाळतोस? अक्षय कुमार म्हणाला…

अक्षय कुमार बॉलिवूडच्या रात्रभर रंगणाऱ्या पार्ट्यांमध्ये जाणं का टाळतो?

ज्या क्षेत्रात भरपूर पैसा आणि प्रसिद्धी असते त्या ठिकाणी पार्टी हा प्रकार येतोच. बॉलिवूड देखील त्याला अपवाद नाही. अनेक कलाकार रुपेरी पडद्यापासून दूर असले तरी ते पार्टीपासून मात्र दूर राहू शकत नाही. परंतु रात्रभर केल्या जाणाऱ्या बॉलिवूडच्या या जंगी पार्ट्यांमध्ये अक्षय कुमार मात्र कधीही दिसत नाही. अक्षय हा बॉलिवूडमधील अशा अपवादात्मक कलाकारांपैकी एक आहे जो पार्ट्यांमध्ये जाणं टाळतो. पण इतका प्रसिद्ध अभिनेता असूनही तो पार्ट्यांमध्ये जाऊन मजामस्ती का करत नाही?

अवश्य पाहा – ‘राजा हिंदुस्तानी’मधील किसिंग सीन कसा केला शूट? दिग्दर्शकाने सांगितला अजब किस्सा

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshy Godara (@akshygodara)

अवश्य पाहा – १७ व्या वर्षी झाली होती मिस इंडिया; बॉलिवूडची ‘दामिनी’ सध्या काय करतेय?

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने पार्टीमध्ये न जाण्याचं कारण सांगितलं. तो म्हणाला, “पार्टीत गेलं की तुम्हाला देखील मग पार्टी द्यावी लागते.” अर्थात त्याने हे उत्तर गंमत म्हणून दिलं. पण खरं सांगायचं झालं तर तो अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आयुष्य जगतो. तो स्वत:चे नियम कधीही मोडत नाही. रात्री लवकर झोपतो व सकाळी लवकर उठतो. सकाळी चार वाजता उठून तो व्यायाम करतो. जर रात्रभर पार्टी केली तर सकाळी व्यायाम करायला उशीर होईल. अन् मग संपूर्ण दिवसाचं वेळापत्रक बिघडून जाईल. त्यामुळे अक्षय पार्ट्यांमध्ये जाणं टाळतो. यापूर्वी दिलेल्या अनेक मुलाखतींमध्ये त्याने हे स्वत:चं अनोखं वेळापत्रक चाहत्यांना सांगितलं आहे. शिवाय त्यांनी देखील यश मिळवायचं असेल तर असं नियोजनबद्ध पद्धतीने आयुष्य जगावं असा सल्ला दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 12:22 pm

Web Title: akshay kumar why avoid bollywood parties mppg 94
Next Stories
1 ‘मनी हाइस्ट’मधल्या ‘इन्स्पेक्टर रकेल’ने गायलं सलमानचं ‘चुनरी चुनरी’ गाणं; पाहा व्हिडीओ
2 ‘म्हशीचं हंबरणं चालेल पण हे गाणं नको’; अमृता फडणवीसांच्या गाण्यावर महेश टिळेकरांची टीका
3 Video : “सोशल मीडियावर असं बोलू नको”, बॉयफ्रेंड विकी जैनवर ओरडली अंकिता लोखंडे
Just Now!
X