27 November 2020

News Flash

‘फिफा’ पाहण्यासाठी ‘बिग बी’ यांचे रात्रभर जागरण

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन फुटबॉल खेळाचे चाहते आहेत की गोष्ट काही नवी नाही परंतु, ७१ वर्षीय अमिताभ बच्चन ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकाचा पहिला सामना पाहण्यासाठी

| June 13, 2014 05:58 am

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन फुटबॉल खेळाचे चाहते आहेत की गोष्ट काही नवी नाही परंतु, ७१ वर्षीय अमिताभ बच्चन ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकाचा पहिला सामना पाहण्यासाठी रात्रभर जागरण केले आणि दुसऱया दिवशी शुटींगसाठी सेटवर जाण्यास उशीर झाला तरी चालेल असे म्हणून आपले फुटबॉल प्रेम पुन्हा जागृत केले.
फोटो गॅलरी: फिफाचा रंगारंग सोहळा..
‘बिग बी’ आपल्या ब्लॉगवर लिहीतात की, “हा विश्वचषक आहे. हा फिफा आहे. येथे संगीत आणि नृत्य ही संस्कृती असलेल्या ब्राझीलने जगाला अनेक सर्वोत्तम खेळाडू दिले आहेत. सामने रात्री उशीरापर्यंत चालणार आहेत, पहिला सामना ब्राझील आणि क्रोएशियामध्ये रंगतोय याच सामन्याची मी वाट पाहत होतो. त्यामुळे उद्या शुटींगसाठी जाण्यास उशीर झाला तरी चालेल…”
फोटो गॅलरी: दस का दम..
यावेळी अमिताभ यांनी फुटबॉल खेळाबद्दलच्या आपल्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. १९९४ सालच्या विश्वचषक अंतिम सामन्यातील ब्राझील विरुद्ध इटलीची लढत पाहण्यासाठी ‘बिग बी’ इतके उस्तुक झाले होते की, कोणतीही पूर्वतयारी नसताना अगदी सामन्याचे तिकीटही नसताना ते तेथे पोहोचले. कसेही करून त्यांना स्टेडियममध्ये जायचे होते.
ते म्हणाले की, “विश्वचषक स्पर्धेतील इटली विरुद्ध ब्राझील असा अंतिम सामना होता. एका मिनिटाचाही विचार न करता मी लगेच सामना स्टेडियमवर जाऊन पाहण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ना माझ्याकडे सामन्याचे तिकीट होते ना कोणत्या हॉटेलचे बुकींक केले होते. तो सामना पाहण्याची मी इतका आतुर झालो होतो की, स्टेडियममध्ये जाण्याचे मी सर्व प्रयत्न केले. शेवटी बक्कळ पैसे देऊन कसेबसे सामन्याचे तिकीट मिळविले आणि ब्राझीलच्या विजयाचा मी साक्षीदार झालो.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2014 5:58 am

Web Title: amitabh bachchan up till late night for fifa world cup 2014
टॅग Fifa World Cup
Next Stories
1 बॉबी को सब मालूम है!
2 ‘क्योकी सास भी कभी बहू थी’ पुन्हा होणे नाही
3 सोनाक्षी घेतेय मार्शल आर्टचे धडे
Just Now!
X