27 February 2021

News Flash

सोना मोहपात्राचे अनु मलिकबाबत वादग्रस्त विधान

अनु मलिक यांचे पुनरागमन ही अत्यंत दुदैवी घटना आहे

अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणाचे आरोप असणाऱ्या अनु मलिक यांच्यावर सोना माहापात्राची जळजळीत टीका

बॉलिवूडमध्ये सुरु झालेल्या # मी टू या चळवळीत अनेक मोठ्या कलाकारांवर स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचे आरोप केले गेले होते. या यादीत संगीत दिग्दर्शक अनु मलिक यांचेही नाव होते. # मी टू अंतर्गत केल्या गेलेल्या आरोपांमुळे त्यांना ‘इंडियन आयडॉल’च्या १०व्या पर्वातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. परंतु आता पुन्हा एकदा अनु मलिक ‘इंडियन आयडॉल’च्या ११व्या पर्वात परीक्षक म्हणून दिसणार आहेत. सोनी वाहिनीने घेतलेल्या या निर्णयावर अभिनेत्री सोना मोहपात्रा हीने आक्षेप घेतला आहे.

सोना मोहपात्राने ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत अनु मलिकवर जोरदार टीका केली आहे. “सोनी वाहिनीने अनु मलिक यांना पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमात परीक्षकपदी रुजु करणे ही अत्यंत दुदैवी घटना आहे. ज्या पालकांना आपल्या मुलांचे उज्वल भविष्य पाहायचे आहे, त्यांच्यासाठी ही घटना म्हणजे जणू कानशिळात लगावण्यासारखेच आहे.” अशा शब्दात तिने आपली नाराजी व्यक्त केली. तसेच “अखेर उंदीर पुन्हा एकदा गटारात परतला ( #AnuMalik #RatReturnsToTheGutter)” असे विधान करत तिने अनु मलिक यांच्यावर जोरदार टीका केली.

अनु मलिक आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्यावर होणाऱ्या प्रत्येक आरोपाला ते तडफदारपणे प्रत्युत्तर देतात. मात्र सोना माहापात्राच्या टीकेवर त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2019 8:51 am

Web Title: anu malik sona mohapatra indian idol 11mppg 94
Next Stories
1 बाप रे… रंगेहाथ पकडलंत; प्रियांका चोप्राचं महाराष्ट्र पोलिसांना उत्तर
2 केबीसीला मिळाला पहिला करोडपती
3 आमिरचे मोगुलमधील पुनरागमन धक्कादायक – गितीका त्यागी
Just Now!
X