News Flash

“सेलिब्रिटीचे निधन फक्त एक तमाशा”; अनुष्का शर्माची पोस्ट चर्चेत

अनुष्काने स्टँड अप कॉमेडियन आणि यूट्यूबर झाकीर खानची पोस्ट शेअर केली आहे.

anushka sharma, zakir khan, celebrity death,
अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला ही पोस्ट शेअर केली आहे.

बिग बॉस विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. वयाच्या ४०व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले आहे. अनेक कलाकार सोशल मीडिया पोस्टद्वारे सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान अभिनेत्री अनुष्का शर्माने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. तिने या पोस्टमध्ये ‘सेलिब्रिटीचे निधन फक्त तमाशाच असतो’ असे म्हटले आहे.

अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला स्टँड अप कॉमेडियन आणि यूट्यूबर झाकीर खानची पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.

Video: तुमचं नाव काय? असं विचारणाऱ्याला साराने दिलेलं उत्तर पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक

anushka sharma, zakir khan, celebrity death,

या पोस्टमध्ये, ‘ते तुम्हाला (सेलिब्रिटींना) माणूस मानत नाहीत. त्यामुळे कोणत्याही मर्यादा नाहीत. तुमचा मृतदेह हा त्यांच्यासाठी एक आत्मा नसलेले शरीर आहे. त्यांच्यासाठी केवळ फोटो काढण्याची एक शेवटची संधी’ असे तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ronny Bhaiya (@zakirkhan_208)

काय आहे पूर्ण पोस्ट?

झाकीर खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘ते तुम्हाला माणूस मानत नाहीत. त्यामुळे कोणत्याही मर्यादा नाहीत. तुमचा मृतदेह हा त्यांच्यासाठी एक आत्मा नसलेले शरीर आहे. केवळ फोटो काढण्याची एक शेवटची संधी.. हे असे आहे की दंगली होत असताना एखाद्या आग लागलेल्या घरातून भांडी चोरणे… कारण त्यानंतर तुमचा काही उपयोग नसतो… जास्तीत जास्त १० फोटो, ५ बातम्या, ३ व्हिडीओ, २ स्टोरी, १ पोस्ट आणि संपलं.. त्यामुळे तुमचे निधन फक्त एक तमाशा बनून राहतो… रडणारी आई देखील तमाशा, बेशुद्ध बहिण, तुमच्यावर प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती एक तमाशा बनते’ या आशयाची पोस्ट केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2021 11:50 am

Web Title: anushka sharma shares zakir khan post on celebrity death avb 95
Next Stories
1 KBC 13: ‘या’ प्रश्नाचं उत्तर देत सौरव गांगुली आणि सेहवागने जिंकले २५ लाख; तुम्हाला उत्तर माहितीये का?
2 Video: ‘सियाज गाडी मैं आए हैं, गरीब लग रहे है’, असे म्हणणाऱ्यावर संतापला अभिनेता
3 ‘माझी नोकरी धोक्यात येईल’, अमिताभ यांनी वीरेंद्र सेहवागकडे सौरव गांगुलींची केली तक्रार
Just Now!
X