26 September 2020

News Flash

अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचं चित्रपटात पदार्पण

हे दोघं लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचंही कळतंय. 

अरबाज खान, जॉर्जिया अँड्रियानी

अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी ही आगामी ‘श्रीदेवी बंगलो’ या चित्रपटातून पदार्पण करत आहे. या चित्रपटात प्रिया वारियर मुख्य भूमिकेत आहे. यामध्ये अरबाजसुद्धा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याची माहिती आहे.

”श्रीदेवी बंगलो या चित्रपटात काम करण्यासाठी मी फार उत्सुक आहे. हा माझा पहिलाच अनुभव असून चित्रपटाच्या शूटिंगची मी आतुरतेने वाट पाहत आहे,” अशी प्रतिक्रिया जॉर्जियाने दिला. या चित्रपटानंतर ती एका तमिळ वेब सीरिजमध्येही काम करणार आहे. दोन वर्षांपूर्वी अरबाज व मलायका अरोरा विभक्त झाले. त्यानंतर तो जॉर्जियाला डेट करू लागला.

प्रशांत माम्पल्ली दिग्दर्शित हा चित्रपट वादात सापडला होता. निर्माते बोनी कपूर यांनी या चित्रपटाच्या नावावरून आक्षेप घेतला आहे. चित्रपटाचे नाव बदलण्याचीही मागणी त्यांनी केली होती.

जॉर्जिया ही मॉडेल असून खान कुटुंबीयांच्या बऱ्याच कार्यक्रमांमध्ये तिला अरबाजसोबत पाहिलं गेलं. हे दोघं लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचंही कळतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2019 5:43 pm

Web Title: arbaaz khan girlfriend giorgia andriani to debut in sridevi bungalow ssv 92
Next Stories
1 गेल्या सहा वर्षांपासून श्रद्धा कपूर भोगतेय ‘हा’ त्रास
2 VIDEO: रानू मंडल यांच्याबद्दल बोलताना हिमेश रेशमियाला आश्रू झाले अनावर
3 ‘अंकिता के पापाजी है मिलिंद’ म्हणणाऱ्यांना मिलिंदचे मजेशीर उत्तर
Just Now!
X