30 November 2020

News Flash

त्या फोटोवरुन ट्रोल करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; दिली कायदेशीर कारवाईची धमकी

"ही केस सायबर बुलिगची होऊ शकते"; अभिनेत्रीने ट्रोलर्सला दिला धमकीवजा इशारा

‘पवित्र रिश्ता’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आशा नेगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ऑनलाईन पोस्ट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या सपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. अलिकडेच तिने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. मात्र हा फोटो काही नेटकऱ्यांना आवडला नाही. या फोटोमुळे तिला काही जणांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. लक्षवेधी बाब म्हणजे आशाने देखील आपल्या अनोख्या शैलीत या ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

अवश्य पाहा – VIDEO: संतापलेल्या अभिनेत्याचं शक्ती प्रदर्शन; हातांनीच केले लोखंडी गेटचे दोन तुकडे

आशाने एका जुन्या घरासमोर उभं राहून फोटो काढला होता. या फोटोमध्ये तिने एका लाकडी खांबाला पकडलं आहे. तिचा हा फोटो काही नेटकऱ्यांना आवडला नाही. “आता तू म्हातारी झाली आहेस, लवकर लग्न कर, तुझ्या पेक्षा ती मागची भिंत अधिक तरुण दिसतेय.” अशा आशयाची पोस्ट लिहित तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ट्रोलर्सच्या या टीकेवर आशाने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. “मित्रांनो तुमच्या विनोदाला मी १०० गुण देते, पण तुमच्या विचारांचं काय करायचं? ही केस सायबर बुलिंगची देखील होऊ शकते.” अशा आशयाची कॉमेंट करत तिने ट्रोलर्सला धमकीवजा इशारा दिला. आशाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – महिला कलाकारांचीच चौकशी का केली जातेय?; अभिनेत्रीचा NCBला सवाल

 

View this post on Instagram

 

When it’s a case of cyber bullying but the humour is too on point!! Dost humour ke 100 points magar is soch ka kya karein

A post shared by MsNegi (@ashanegi) on

कोण आहे आशा नेगी?

आशा नेगी एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. २०१० साली तिने ‘सपनों से भरे नैना’ या मालिकेतून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिने ‘मधुरा’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर तिने ‘हिटलर दिदी’, ‘कबूल है’, ‘पुनर विवाह’, ‘जमाई राजा’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘बडे अच्छे लगते है’ या दोन मालिकांमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. ‘बिग बॉस’, ‘बॉक्स क्रिकेट लीग’, ‘नच बलिये’ यांसारख्या अनेक रिअॅलिटी शोमध्ये देखील ती झळकली आहे. ‘लुडो’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. शिवाय अलिकडेच ‘बारीश’ या वेब सीरिजमध्ये देखील ती झळकली होती. या सीरिजमध्ये तिने ‘शर्मन जोशी’सोबत काम केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 1:48 pm

Web Title: asha negi response to troll married because she is getting old mppg 94
Next Stories
1 … म्हणून सायरा बानो यांनी केलं पाकिस्तान सरकारचं कौतुक
2 दिग्दर्शक अक्षय इंडीकरचे फेसबुक अकाऊंट झाले हॅक
3 ‘स्थलांतरित मजुरांच्या समस्येकडे माध्यमांचं दुर्लक्ष’; मनोज वाजपेयीची खंत
Just Now!
X