How many times MS Dhoni was dismissed for zero : आयपीएल २०२४ मध्ये अलीकडेच एमएस धोनी धर्मशाला येथे पंजाब किंग्जविरुद्ध शून्यावर बाद झाला होता. पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने माहीला बाद केले. पण तुम्हाला माहिती आहे का की आयपीएलमध्ये आतापर्यंत किती गोलंदाजांनी महेंद्रसिंग धोनीला शून्यावर बाद केले आहे? वास्तविक, या यादीत अनेक गोलंदाजांची नावे आहेत. शेन वॉटसनने सर्वप्रथम महेंद्रसिंग धोनीला आयपीएल २०१० मध्ये शून्यावर बाद करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.

कोणत्या गोलंदाजांनी धोनीला शून्यावर बाद केले?

आयपीएल २०१० मध्ये शेन वॉटसननंतर डर्क नॅनिसने माहीला शून्यावर बाद केले. अशाप्रकारे आयपीएल २०१० च्या हंगामात एमएस धोनी दोनदा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. यानंतर हरभजन सिंगने महेंद्रसिंग धोनीला तिसऱ्यांदा शून्यावर बाद केले. आयपीएल २०१५ मध्ये हरभजन सिंगने माहीला शून्यावर बाद करण्याचा पराक्रम केला होता. त्याचबरोबर आवेश खानचे नावही या खास यादीत सामील झाले आहे. आयपीएल २०२१ मध्ये आवेश खानने कॅप्टन कूलला खातेही उघडू दिले नव्हते. महेंद्रसिंग धोनी शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतण्याची आयपीएलच्या इतिहासातील ही चौथी वेळ होती.

Why Harshal Patel not celebrated MS Dhoni Wicket
IPL 2024: हर्षल पटेलने धोनीचा त्रिफळा उडवल्यानंतर सेलिब्रेशन का केलं नाही? स्वत: सांगितलं मोठं कारण
IPL 2024 Playoffs Scenario for RCB
IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?
sunrisers hyderabad
SRH vs LSG: हरली लखनौ, पण आव्हान संपलं मुंबईचं; सनरायझर्सनं अवघ्या पाऊण तासात सामना घातला खिशात!
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
RCB or CSKWhich Team Will Reach Playoffs if Match Called off Due to Rain
RCB vs CSK सामन्यावर पावसाचे सावट, पावसामुळे मॅच रद्द झाल्यास कोणता संघ IPL मधून बाहेर होणार?
Nitish Kumar Reddy Takes Quinton De Kock
SRH vs LSG : नितीश कुमार रेड्डीने सीमारेषवर अप्रतिम झेल पकडत चाहत्यांना केले आश्चर्यचकित, पाहा VIDEO
DC beat RR by 20 Runs sanju samson wicket Controversy
IPL 2024: संजू सॅमसनला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त; राजस्थान पराभूत, प्लेऑफ प्रवेश लांबणीवर
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

माही आयपीएलमध्ये पाचव्यांदा शून्यावर बाद –

धर्मशाला येथे पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्जचे संघ आमनेसामने होते. या सामन्यात पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने धोनीला शून्यावर बाद केले. अशाप्रकारे आयपीएलच्या इतिहासात पाचव्यांदा माही खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. महेंद्रसिंग धोनीची आयपीएल कारकीर्द मात्र अप्रतिम राहिली आहे.

हेही वाचा – IPL 2024 : राजस्थान रॉयल्सच्या पराभवाने आरसीबीची वाढली धाकधूक, जाणून घ्या प्लेऑफचे समीकरण

या यष्टीरक्षक फलंदाजाच्या नावावर आयपीएलच्या २५१ सामन्यांमध्ये १३७.०६ च्या स्ट्राईक रेट आणि ३९.०४ च्या सरासरीने ५१९२ धावा आहेत. तसेच, या स्पर्धेत माहीने २४ वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. याबरोबरच त्याची सर्वोच्च धावसंख्या ८४ धावा आहे.