News Flash

Bigg Boss 14 : ‘बिग बॉस’च्या घरात होणार या चर्चेतल्या सेलिब्रिटींची एण्ट्री?

'बिग बॉस'चा चौदावा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

छोट्या पडद्यावरील सर्वांत वादग्रस्त व तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा चौदावा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात हा शो सुरु होणार असून यावेळी बिग बॉसच्या घरात कोणत्या सेलिब्रिटींची एण्ट्री होणार याची उत्सुकता आहे. यंदाच्या सिझनसाठी तीन सेलिब्रिटींची नावं सध्या चर्चेत आहेत.

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, छोट्या पडद्यावरील बहुचर्चित कलाकार निया शर्मा व विवियन डिसेना यांची नावं चर्चेत आहेत. तर शेखर सुमन यांचा मुलगा व अभिनेता अध्ययन सुमन यालासुद्धा विचारण्यात आल्याचं समजतंय. ‘राज ३’ या चित्रपटात अध्ययन झळकला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अध्ययन व कंगना रणौत यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या.

निया शर्मा ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘नागिन- भाग्य का जहरीला खेल’ या मालिकेत तिने भूमिका साकारली होती. तर आशियातील सर्वांत सेक्सी महिलांच्या यादीत तिने दोन वेळा स्थान मिळवलं होतं. दुसरीकडे विवियनने ‘शक्ती – अस्तित्त्व के एहसास की’, ‘प्यार की ये एक कहानी’, ‘मधुबाला- एक इश्क एक जुनून’ या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

पाहा फोटो : दोनाचे चार हात; लॉकडाउनच्या काळात ‘या’ मराठी कलाकारांची जमली जोडी

‘बिग बॉस’चा तेरावा सिझन फार चर्चेत होता. टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने शोचं विजेतेपद जिंकलं होतं. तर असिम रियाज आणि शहनाज गिल दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 12:02 pm

Web Title: bigg boss 14 adhyayan suman nia sharma vivian dsena to participate in salman khan show ssv 92
Next Stories
1 ‘इश्कबाज’फेम अभिनेत्री श्रेनू पारिखला करोनाची लागण
2 …जेव्हा अंकिताने सुशांतला केलं होतं प्रपोज; थ्रोबॅक व्हिडीओ होताय व्हायरल…
3 ‘या’ कारणामुळे प्रिती आणि राणीच्या मैत्रीमध्ये पडली होती फूट?
Just Now!
X